बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार एकत्र सरकार स्थापन करणार

बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार एकत्र सरकार स्थापन करणार

मोदी यांनी नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आणि आता भाजपने जेडीयूला पाठिंबा जाहीर केलाय

  • Share this:

23 जुलै : बिहारच्या राजकारणात नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे भूकंप घडलाय. नितीशकुमार यांच्या राजीनाम्यामुळे राजद आणि जदयूची युती तुटण्यात जमा झाली आहे. मोदी यांनी नितीशकुमार यांचं अभिनंदन केलं आणि आता भाजपने जेडीयूला पाठिंबा जाहीर केलाय. सरकारमध्ये भाजप सहभागीही होणार आहे. भाजपने पाठिंबा दिल्यामुळे जेडीयूला बिहारमध्ये सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. जेडीयूच्या 71 आणि भाजपच्या 53 जागा मिळून बहुमताचा 122 जागांचा आकडा सहज गाठता येणार आहे. भाजप आणि जेडीयू एकत्र आल्यामुळे मात्र लालू प्रसाद यादव यांचा पत्ता आता कट झालाय.

 

काय स्थिती आहे बिहारची?

.....................................

एकूण -243

बहुमत - 122

लालू प्रसाद यादव- 80

नितीशकुमार - 71

काँग्रेस - 27

भाजप- 53

इतर - 5

आता नितीशकुमार-भाजप सरकार?

...........................

बहुमत- 122

नितीशकुमार-71

भाजपा- 53

..................

एकूण- 124

First published: July 26, 2017, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading