नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर निशाना साधला आहे. त्यांनी सांगितले की भाजप, आरएसएस भारतात फेसबुक (Facebook) आणि व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) नियंत्रण ठेवत आहेत. ते या माध्यमातून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवत आहेत.
राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राच्या रिपोर्टचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर निशाना साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की, भाजप आणि आरआरएस भारतातील फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर नियंत्रण ठेवत आहेत. ते या माध्यमातून खोट्या बातम्या आणि समाजात द्वेष पसरवत आहेत. ते याचा उपयोग मतदारांना प्रभावित करण्यासाठी करीत आहेत.
फेसबुकच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतात असे अनेक व्यक्ती आहेत जे सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर द्वेष पसरवीत आहेत. कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की वर्च्युअल जगात द्वेष पसरवणारी पोस्ट केल्यामुळे खऱ्या जगात हिंसा व तणाव वाढतो.
BJP & RSS control Facebook & Whatsapp in India.
They spread fake news and hatred through it and use it to influence the electorate.
Finally, the American media has come out with the truth about Facebook. pic.twitter.com/Y29uCQjSRP
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 16, 2020
काय आहे प्रकरण
अमेरिकेच्या समाचार पत्र वॉल स्ट्रील जनरलच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय जनता पक्षाचे नेता टी. राजा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की रोहिंग्या मुस्लिमांना गोळी मारायला हवी. मुस्लिमांना देशद्रोही सांगितले गेले आणि मशिद पाडण्याची धमकी दिली होती. याचा विरोध फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी केला होता आणि या कंपनीच्या नियमांच्या विरोधात होता. कंपनीच्या भारतात असणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. आता फेसबुकच्या विश्वसार्हतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे.