दिल्लीत भाजप आणि आपचे धरणा आंदोलन, सर्व कामकाज रामभरोसे

दिल्लीत भाजप आणि आपचे धरणा आंदोलन, सर्व कामकाज रामभरोसे

दिल्लीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री चार दिवसापासून उपराज्यपाल यांच्या घरात उपोषण करून ठिय्या आंदोलन करतायेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून : दिल्लीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री चार दिवसापासून उपराज्यपाल यांच्या घरात उपोषण करून ठिय्या आंदोलन करतायेत.

तर मुख्यमंत्र्यांनी नौटंकी बंद करून नागरिकांना पिण्याचं पाणी द्यावं असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री निवासाबाहेर ठिय्या सुरू केलंय. त्यामुळे दिल्ली सरकार आणि प्रशासनाचं कामकाज ठप्प पडलंय. आपचे कार्यकर्ते, आमदार गायब झाल्यानं आपचा इथला पंडाल ओस पडलाय.

दरम्यान केजरीवालांच्या या आंदोलनाची खिल्ली उडवत हा फक्त तमाशा असल्याचं स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी म्हंटलंय. संपूर्ण दिल्ली पाण्याच्या प्रश्नाला तोंड देतंय. आणि त्यात केजरीवाल एसीमध्ये बसून उपोषणाला बसलेत.

स्वराज इंडिया येत्या 16 जून पासून जल स्वराज मोहीम राबवणार आहे. यात केजरीवाल सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण या सगळ्यातून पाण्यासाठी त्रासलेल्या दिल्लीकरांना पाणी मिळणार का आणि दिल्लीतला ठप्प कारभार सुरू कधी होणार याच्याच प्रतिक्षेत दिल्लीकर आहेत.

First published: June 14, 2018, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading