Home /News /national /

अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य

अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य

महाराष्ट्रातील नव्या सरकारवर अमित शहा यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

    नवी दिल्ली, 18 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शह दिल्याची चर्चा झाली. महाराष्ट्रातील या नव्या सरकारवर आता अमित शहा यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 'महाराष्ट्रात शरद पवार यांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि शिवसेनेनं ते टिपले,' असा घणाघात अमित शहा यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रात सध्या जी काही राजकीय स्थिती निर्माण झाली आहे, त्यात आम्हाला अपयश आलं असं मला वाटत नाही, असंही अमित शहा म्हणाले. अमित शहा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपद आणि निवडणूकपूर्वी स्थिती यावरही भाष्य केलं आहे. खडसेंचं ठरलं? राष्ट्रवादी आणि सेनेच्या मोठ्या नेत्यांच्या भेटीला नागपुरात पोहोचले 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात आम्ही सातत्याने सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. तेव्हा शिवसेनेनं त्यांची मागणी केली नाही. मात्र निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेना मुख्यमंत्रिपदाबद्दल बोलायला लागली. आमच्या युतीतील साथीदारच विरोधकांसोबत गेल्याने आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही,' असंही अमित शहा म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि अमित शहा अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात आलं. मात्र गोवा, मणिपूर, कर्नाटक अशा राज्यांत बहुमत नसताना सत्ता खेचून आणण्याऱ्या भाजपला महाराष्ट्रात अपयश का आलं, याची देशभरात जोरदार चर्चा झाली. 'सामना'वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, केली बोचरी टीका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. अशातच भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती तुटली आणि महाराष्ट्रात मोठं सत्तानाट्य सुरू झालं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने या ऐतिहासिक आघाडीने सत्तास्थापनेचा प्रयत्न सुरू केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 'आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही,' असं म्हणत भाजपने सत्तेपासून दूर होण्याची भूमिका घेतली. मात्र 23 नोव्हेंबरला सकाळी अगदी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांना साथ होती राष्ट्रवादीतून बंड केलेल्या अजित पवार यांची. सुरुवातीला संपूर्ण राष्ट्रवादीचा आपल्याला पाठिंबा असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगण्यास सुरुवात केली. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा दावा खोडत आपण शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या सत्तास्थापनेच्या बाजून असल्याचं स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने आणि खुल्या पद्धतीने बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर तर संपूर्ण चित्र पालटलं. कुटुंबातील सदस्यांचा आग्रह आणि न्यायालयाचा निर्णय या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपची उरलीसुरली आशाही मावळली आणि देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Amit Shah, BJP

    पुढील बातम्या