भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

मतदान केंद्रापासून जवळ एका झाडावर मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 02:50 PM IST

भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

कोलकाता, 18 एप्रिल : निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान सुरू आहे. एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने आसपासच्या मतदान केंद्रांवर त्याचे पडसाद उमटले. पश्चिम बंगालच्या पुरुलिया भागात ही घटना घडली.

देशाच्या काही भागात मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं, तर काही भागात मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

शिशुपाल साहिस असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. स्थानिक भाजप नेत्यांनी दावा केला आहे की, ही व्यक्ती भाजप युवा मोर्चाचं काम करणारी होती.

घटनेची माहिती मिळताच पुरुलियामध्ये मोठ्या संख्येने पोलीसबळ पाठवण्यात आलं. पोलीस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वी सिलीगुडीला भाजपच्या एका बूथ ऑफिसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. 42 वर्षांच्या इसमाचा मृतदेह दोरीला बांधलेल्या अवस्थेत भाजपच्या स्थानिक कार्यालयात लटकताना दिसला होता. त्यानंतर आता ही घटना पुढे आली आहे.

Loading...

मतदान केंद्रावर कब्जा केल्याचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये इस्लामपूर लोकसभा मतदारकेंद्रात तृलमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान सीपीएमचे खासदार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर दगडफेक झाली. 'तृणमूलच्या काही गुंडांनी हल्ला केल्याचा' आरोप त्यांनी केला. मतदार केंद्रावर मतदारांना धमकवण्यातही येत होतं, असाही आरोप त्यांनी केला आहे.

यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं. हाय वे बंद करण्यात आले. इस्लामपूरच्या चोप्रा इथल्या मतदान केंद्राजवळ निदर्शनं करण्यात आली. काही निदर्शकांनी मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याचे प्रकार झाले, असं वृत्त ANI  ने दिलं आहे. निदर्शकांना हटवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराची नळकांडी फोडली.


VIDEO पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...