Home /News /national /

केम्ब्रिज विद्यापीठात पहिल्याच नजरेत सोनिया पडल्या होत्या राजीव गांधींच्या प्रेमात...

केम्ब्रिज विद्यापीठात पहिल्याच नजरेत सोनिया पडल्या होत्या राजीव गांधींच्या प्रेमात...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (INC) अध्यक्षा सोनिया गांधी(soniya gandhi) यांचा आज वाढदिवस. वयाच्या पंचाहत्तरीत त्या प्रवेश करत आहेत.

    नवी दिल्ली, 9 डिसेंबर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (INC) अध्यक्षा सोनिया गांधी(soniya gandhi) यांचा आज वाढदिवस. वयाच्या पंचाहत्तरीत त्या प्रवेश करत आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (rajiv gandhi) यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या भारतात राहू लागल्या. परंतु त्याआधी त्यांची राजीव गांधी यांच्याशी लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात (cambridge university) भेट झाली होती. इटलीतील सोनिया गांधी या 7 जानेवारी 1965 ला केम्ब्रिज विद्यापीठात आल्या. येथे विविध विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतं. त्याकाळी तुम्ही परदेशी असाल तर तेथील एका स्थानिक कुटुंबात तुमची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असे. सोनिया गांधी यांना देखील या पद्धतीने एक घर मिळाले होते. परंतु सुरुवातीला त्यांना तेथील जेवण आवडले नाही तसेच इंग्रजी बोलण्यास देखील अडचण येत होती. त्यानंतर त्यांना कॅम्पसमध्ये ग्रीक रेस्टॉरंट सापडलं. या ठिकाणी त्यांना इटालियन जेवण मिळत होते आणि विद्यार्थ्यांना परवडेल असे दरदेखील असल्याने सोनिया दररोज ता ठिकाणी खाण्यासाठी येत असतं. राजीव गांधी देखील या ठिकाणी आपल्या मित्रांबरोबर अनेकदा येत असतं. जेव्हा सोनिया यांनी पहिल्यांदा राजीव गांधींना पहिले या ठिकाणी पहिल्यांदा सोनिया यांनी राजीव गांधी यांना पाहिलं होतं. शांत आणि सुंदर असं त्यांचं रूप होतं. त्याचबरोबर त्यांचा स्वभाव देखील खूप विनम्र होता. एकदिवस सोनिया गांधी या ठिकाणी जेवताना राजीव गांधी दोघांचा कॉमन मित्र क्रिस्टियन वॉन स्टीगलिज याच्या बरोबर तिथे आला. त्यानंतर दोघांचा एकमेकांशी परिचय झाला. सोनिया गांधी यांनी आपल्या अ‍ॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाइफ, एन इंडियन डेस्टिनी(An Extraordinary Life, An Indian Destiny) या आत्मचरित्रात लेखिका राणीसिंग यांना लिहिलंय की, पहिल्याच नजरेत सोनिया या राजीव गांधींच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांनी आधीच आपला मित्र क्रिस्टियन याला ओळख करून देण्यास सांगितलं होतं. राजीव आईला लिहिलेल्या पत्रामध्ये सोनियांबद्दल लिहीत असत त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ट मैत्री झाली. गांधी आणि नेहरू घराण्यामध्ये लांबलचक पत्र लिहण्याची परंपरा आहे. त्याच पद्धतीने राजीव गांधीदेखील आपल्या आईला इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना पत्र लिहीत. पत्रामध्ये ते आपले कॅम्पस, आयुष्य आणि डेली रुटीन संदर्भात सर्व माहिती देत. त्यानंतर लवकरच पत्रांमध्ये ते सोनिया गांधी यांचा देखील उल्लेल्ख करू लागले. त्यावेळी राजीव यांच्याकडे लाल रंगाची जुनी गाडी होती दोघेही आपल्या कुटुंबापासून लांब होते. तणावमुक्त आणि स्वतंत्र असल्याने त्यांच्याकडे असलेल्या फोक्सवॅगनच्या लाल रंगाच्या गाडीतून ते रोज सोनियांच्या घराजवळ येत असतं. सोनिया आणि राजीव आपल्या मित्रमंडळींसह सुट्टीच्या दिवशी गाडीतून फिरायला जात असतं. पेट्रोलचे पैसे देखील सर्वजण वाटून घेत असंत. तर कधीकधी राजीव गांधी सोनिया यांच्यासोबत कार रेसिंग पाहण्यासाठी सिल्व्हरस्टोनला जात असतं. राजीव अधिक कमाईसाठी बेकरीत काम करत अनेक विद्यार्थ्यांना घरून कमी पैसे मिळत असल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. त्यामुळे मोकळ्या वेळेत कुठेही काम करत असतं. राजीव गांधीव देखील जास्त पैसे मिळण्यासाठी बेकरीमध्ये काम करत असतं. यासंदर्भात पुस्तकात देखील उल्लेल्ख करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, सोनिया गांधी यांच्याकडे मुबलक पैसे असायचे. इतर मित्रांचे महिन्याचे सर्व पैसे संपल्यानंतर देखील सोनिया गांधी यांच्याकडे पैसे शिल्लक असतं. राजीव यांचे मित्र ताहिर जहांगीर यांनी पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सोनिया गांधी नेहमी उत्तम कपडे घालत आणि नेहमी हसतमुख असतं. सोनिया केम्ब्रिजमधील सर्वात सुंदर युवती होत्या त्यावेळी केम्ब्रिज विद्यापीठात मुलं आणि मुलींच्या संख्येत खूप तफावत होती. 12 मुले आणि 1 मुलगी अशी तफावत त्यावेळी होती. लांब केस आणि सुडौल बांध्याच्या सोनिया त्यावेळी केम्ब्रिजमधील सर्वांत सुंदर युवती होत्या. राजीव यांना फोटोग्राफीचा छंद असल्याने ते सोनिया यांचे खूप फोटो काढत असतं. राजीव गांधी त्यांच्यासाठी खास बनले होते. परंतु आपण दोघेही वेगळ्या दुनियेतील म्हणजे भिन्न संस्कृतीतील असल्याचे दोघानांही माहीत होते. परंतु त्या वातावरणात दोघेही आयुष्यातील सुंदर क्षणांचा आनंद घेत होते. इंदिरा पहिल्यांदा लंडनमध्ये सोनियांना भेटल्या राजीव गांधी यांनी पहिल्यांदा पत्रात सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांच्याबद्दलच्या भावना लिहिल्या. त्याचबरोबर लंडनमध्ये इंदिरा आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची व्यवस्था केली. त्यावेळी त्या पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (lal bahadur shastri) यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. भेटीवेळी सोनिया खूपच नर्व्हस होत्या. दुसरी भेट ही लंडनच्या केनिंगटन पॅलेस  गार्डनमधल्या भारतीय हायकमिश्नरच्या घरी झाली होती. नर्व्हस होत्या सोनिया, फ्रेंचमध्ये झालं बोलणं इंदिरा गांधींनी सोनियांना या भेटीत रिलॅक्स करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी सोनिया यांच्याशी फ्रेंचमध्ये गप्पा मारल्या. इंग्रजीच्या तुलनेत फ्रेंचमध्ये गप्पा मारणे सोनियांना सोपे जाणार असल्याने इंदिरा गांधींनी फ्रेंचमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. अभ्यासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोनिया यांचे  राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्याशी चांगले संबंध झाले होते. परंतु सोनिया यांच्या कुटुंबाबद्दल हे अगदी उलटे होते. सोनियांच्या घरच्यांनी साफ नकार दिला सोनिया यांनी राजीव गांधी यांच्याबरोबर असलेलं नातं आणि प्रेमसंबंधाबद्दल घरी काहीही सांगितले नव्हते. आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात देखील त्यांनी सोनिया असे का करत आहे हे आपल्याला समजत नसल्याचे म्हटले होते. परंतु सोनिया यांनी राजीव गांधी यांच्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याचं म्हणजेच लग्न करण्याचा मनात पक्कं केलं होतं. त्यानंतर ओरबासानो येथे परत गेल्यानंतर चर्चा करण्याचे नक्की केले होते. घरच्यांना ही गोष्ट समजल्यानंतर ते खुश नव्हते. त्या तशाच पुन्हा केम्ब्रिजला परत आल्या. पण त्यांचे हे प्रकरण समजल्यानंतर घरचे त्यांना केम्ब्रिजला परत पाठवायला तयार नव्हते. भविष्याबद्दल चिंतीत होते दोघेही त्यानंतर राजीव गांधी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे(Mechanical Engineering) शिक्षण घेण्यासाठी लंडनच्या इंपिरिअल कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यामुळे आठवड्यात एकदाच दोघांची भेट होत असे. परंतु दोघांनीही एकत्र राहण्याचे नक्की केले होते. पण आपल्या भविष्याबद्दल त्यांना काळजी वाटत होती. सोनियांना त्यांच्या कडक वडिलांची खूप भीती वाटत होती. परंतु दोघांनी लग्न करून भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता. सोनिया इटलीला परत गेल्या जुलै 1966 मध्ये इटलीला(Italy) परत गेल्या. राजीव गांधींनी त्यांचे वडील स्टेफनो यांना भेटण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एका बांधकाम साईटवर काम करून पुरेसा पैसा जमा केलेला. दोघेही एकमेकांना नियमित पत्र लिहीत असत. राजीव आता इंजिनिअरिंग सोडून पायलटचे लायसन्स मिळवण्यासाठी ट्रेनिंग घेत होते. राजीव यांनी इटलीला जाऊन सोनियांच्या पालकांची भेट घेतली नोव्हेंबर 1966 मध्ये राजीव यांनी इटलीला जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली. सोनियांच्या घरातील व्यक्तींना देखील राजीव आवडले. परंतु सोनिया यांचे वडील स्टेफनो (Stefano) यांनी लग्नाला होकार दिला नाही. आपली मुलगी परदेशात कशी राहील याची त्यांना चिंता होती. आपण लग्नाला होकार दिला तर चांगल्या वडिलांचे कर्तव्य आपण पार पाडणार नाही असे त्यांना वाटले. सोनिया यांनी लिहिलेल्या पुस्तकात लेखिकेला सांगितले, या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु सोनिया ऐकण्यास तयार नाही असे दिसल्यानंतर त्यांनी एका अटीवर लग्नाला परवानगी दिली. दोघांनी लग्नासाठी एक वर्षांची वाट पाहायची. या काळात देखील दोघांचे प्रेम असेच राहिले तर लग्न करण्यास त्यांनी परवानगी दिली. त्याचबरोबर लग्नात काही अडचण आली तर मला जबाबदार धरायचे नाही असे देखील सांगितले. एक वर्षानंतर सोनिया दिल्ली एयरपोर्टवर उतरल्या सोनिया गांधी यांनी वर्षभर वाट पहिली. स्टेफनो यांना वर्षभरात सोनिया राजीव यांना विसरेल असे वाटले. परंतु असे झाले नाही. 13 जानेवारी 1968 ला सोनिया दिल्ली एयरपोर्टवर उतरल्या. त्यांना घ्यायला राजीव आपला भाऊ संजय (Sanjay Gandhi) याच्याबरोबर आले होते. सोनिया यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्या घरी थांबवण्यात आले होते. त्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress, Sonia gandhi

    पुढील बातम्या