News18 Lokmat

जोधपूर कारागृहात भवरीदेवी हत्याकांडातील आरोपीने साजरा केला वाढदिवस!

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भवरीदेवी हत्याकांडाती आरोपीने वाढदिवस साजरा केल्याचा फोटो व्हायरल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 07:50 PM IST

जोधपूर कारागृहात भवरीदेवी हत्याकांडातील आरोपीने साजरा केला वाढदिवस!

जोधपूर, 2 सप्टेबर : आसाराम आणि शंभूलाल रेगर नंतर आता जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भवरीदेवी हत्याकांडाती आरोपीने वाढदिवस साजरा केल्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालाय. केक कापतानाच्या या फोटोमुळे जोधपूर कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले असून, कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्नही एरणीवर आलंय.

कारागृहातील हिस्ट्रीशीटर आणि शास्त्रीनगरातील मॉलसमोर एका व्यक्तीवर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीने शुक्रवारी जोधपुरच्या मध्यवर्ती कारागृहात वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त कारागृरात साजऱ्या झालेल्या या पार्टिला भवरी देवी हत्याकांडातील आरोपी कैलास जाखड, दिनेश विश्नोई, माजी नगरसेवक परशराम विश्नोई हे देखील सहभागी झाले होते. यावेळी केक कापताना काढण्यात आलेला फोटो सद्या सोशल मिडियावर व्हायरल झालाय. राकेश मांजू या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी कारागृर प्रशासनाने अनुमतीसुद्धा दिली होती अशी माहिती आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोबाबत माहिती मिळताच कारागृह अधिक्षक कैलास त्रिवेदी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जोधपूर कारागृहात मिठाई घेऊन जायला परवानगी आहे. मात्र, कारागृहात मोबाईलद्वारे फोटो काढणे हा अपराध असताना या पार्टीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालेत ही बाब चिंतनीय असल्याचे कारागृह अधिक्षकांचे म्हणणे आहे.

 PHOTO : गोविंदा आला रे... या आहेत मुंबईतल्या प्रसिद्ध दहीहंड्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...