पासपोर्टसाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक नाही

पासपोर्टसाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक नाही

जन्म तारखेचा पुरावा म्हणून यापुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय.

  • Share this:

24 जुलै: पासपोर्ट काढण्यासाठी आता जन्माचा दाखला बंधनकारक राहणार नाही. भारतीय नागरिकांसाठी पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु असून जन्म तारखेचा पुरावा म्हणून यापुढे आधार किंवा पॅन कार्डही ग्राह्य धरले जाईल असे सरकारने स्पष्ट केलंय.

पासपोर्ट नियमावली १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या व्यक्तींना जन्म तारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला दाखवणं बंधनकारक आहे. जन्माच्या दाखल्याची एक प्रत पासपोर्टसाठीच्या अर्जासोबत जोडावी लागते. मात्र या नियमात आता बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेत नव्या नियमांविषयी माहिती दिली. पासपोर्टची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार किंवा पॅन कार्ड वापरता येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्डही सादर करता येईल.

देशातील कोट्यवधी जनतेला पासपोर्ट काढणे सोपे व्हावे यासाठी नियमात बदल केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी संसदेत सांगितले.

First published: July 24, 2017, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading