पक्षी धडकल्याने Air Indiaच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

पक्षी धडकल्याने Air Indiaच्या विमानाचं  इमर्जन्सी लँडिंग

AI-018 या विमानाने अहमदाबाच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 10 मिनिटांमध्येच विमानाला पक्षाची धडक बसली.

  • Share this:

अहमदाबाद 20 जुलै : अहमदाबादहून दिल्‍लीला जाणाऱ्या एयर इंडियाच्या विमानाचं अहमदाबादला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानाने उड्डाण करताच विमानाला पक्षाची धडक बसली. त्यामुळे विमानाला तातडीने उतरविण्यात आलं. विमानात 97 प्रवासी होती. सुदैवाने कुणाला काहीही दुखापत झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून विमान उतरविण्यात येत असल्याचं वैमानिकाने प्रवाशांना सांगितलं.

AI-018 या विमानाने अहमदाबाच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर 10 मिनिटांमध्येच विमानाला पक्षाची धडक बसली. वैमानिकाला याची माहिती होताच त्याने तातडीने विमान उतरविण्याचा निर्णय घेतला. कारण अशा अवस्थेत विमान जास्त उंचीवर नेणं सुद्धा धोक्याचं असतं.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार प्रवाशांना दुसरं फ्लाईटसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अनेकांना दिल्लीवरून दुसरं फ्लाईट पकडायचं होतं त्यांनाही सर्व कार्यक्रम बदलावा लागला.

मुख्यमंत्रिपदाच्या वादावर आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद' यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली. आदित्य यांच्या यात्रेदरम्यान त्यांना हमखास प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे युतीचं राज्य पुन्हा आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? त्यामुळे आदित्यच आता प्रत्येक सभेत त्यावर आपलं मत व्यक्त करताहेत. मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही तर मला महाराष्ट्र  सुजलाम सुफलाम घडवायचा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर नेत्यांनी बोलू नये अशी तंबी दिली होती.

आनंदीबेन पटेल UPच्या राज्यपाल, धनखड ठेवणार 'दीदीं'च्या कारभारावर लक्ष

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मी मुख्यमंत्री बनावं याकरिता जन आशीर्वाद यात्रा नाही. मला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम घडवायचा आहे.1995 मध्ये नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन झाले आणि शिवसेनेचं सरकार राज्यात आलं. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा त्यासाठी नाशिकला आलोय.

शिवसेनेवर, सेनेच्या नेत्यांवर जनता प्रचंड प्रेमकरतेय. आपल्या कामानी, मेहनतीने महाराष्ट्र भगवा होणार. युतीची सत्ता पुन्हा येणार, दुष्काळ मुक्त, प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. कार्यकर्त्यांची ताकद, उत्साह जल्लोश पुढे घेऊन जाणार आहे असं आदित्य यांनी सांगितलं.

छोट्या एक शिंगी गेंड्याची मोठी अंघोळ, शॉवर बाथचा VIDEO व्हायरल

'आदित्यच करणार नेतृत्व'

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आदित्य यांच्यासोत यात्रेत आहेत. मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य स्पष्ट भाष्य करत नसताना राऊत हे मात्र आदित्य यांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं सांगत आहेत.

राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी पाहिलेली अपूर्ण स्वप्न आज उद्धव आणि आदित्य ठाकरे पूर्ण करताहेत. नव्या दमानं, नव्या जोमानं आदित्य ठाकरे मैदानात उतरलेत. याच नाशकातून आदित्य ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करतील. आदित्य ठाकरे यांनी शिवसेना सरकार आणि तरुणांचं नेतृत्व करावं ही जनतेची ईच्छा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 09:42 PM IST

ताज्या बातम्या