नवी दिल्ली, 9 जानेवारी : केंद्र सरकारने (Central Government) शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं आहे. केंद्राने या सहा राज्यांना कृती योजनेनुसार या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे निर्देश दिल आहेत.
दिल्लीतील हस्तसाल विलेड डीडीए पार्कमध्ये 16 पक्षांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लू संक्रमणाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसंच इतर राज्यांनाही पक्षांच्या आकस्मिक मृत्यूबाबत सतर्क राहण्याचं आणि त्याबाबत माहिती देण्याचं सांगण्यात आलं आहे, जेणेकरून कमी वेळेत आवश्यक पाऊलं उचलली जाऊ शकतील.
प्रभावित राज्य केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेशचा दौरा करण्यासाठी केंद्रीय टीमची स्थापना करण्यात आली आहे, जी संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून महामारीसंबंधी आवश्यक चौकशी करतील.
तसंच चिकन आणि अंडी यांच्या वापराबाबत अफवांवर लगाम घालण्यासाठी आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाला योग्य ती माहिती, सल्लामसलत करण्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bird flu