मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीमध्ये Bird Flu ची भीती! सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे, प्रशासनाची घटनास्थळी धाव

दिल्लीमध्ये Bird Flu ची भीती! सेंट्रल पार्कमध्ये आढळले 100 मृत कावळे, प्रशासनाची घटनास्थळी धाव

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आता बर्ड फ्लूची (Bird Flu) भीती निर्माण झाली आहे. दिल्लीमधील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनं प्रशासन अलर्ट झालं आहे.

पुढे वाचा ...

दिल्ली, 8 जानेवारी: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सामना करणाऱ्या राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आता बर्ड फ्लूची (Bird Flu) भीती निर्माण झाली आहे. दिल्लीमधील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये 100 कावळ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनं प्रशासन अलर्ट झालं आहे. या घटनेची माहिती समजताच डॉक्टरांच्या टीमनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आहे. यापूर्वी केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये ‘बर्ड फ्लू’ च्या केस समोर आल्या होत्या.

काय आहे प्रकरण?

मयूर विहारमधल्या सेंट्रल पार्कमधील मृत कावळ्यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हायरल व्हिडीओनंतर News 18 च्या टीमनं या व्हिडीओची सत्यता पडताळणी करण्यासाठी सेंट्रल पार्कला भेट दिली.

(हे वाचा-व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणीचा गेला तोल, पुलावरून कोसळून जागीच ठार!)

मयूर विहारमधील ट्रेकर टिंकू चौधरी यांनी यावेळी News 18 ला दिलेल्या माहितीनुसार, ‘या पार्कमधील सुमारे 100 पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक कावळ्यांची अवस्था बिकट आहे’. व्हायरल होत असलेला व्हिडीओ आपणच बनवला असल्याचं चौधरी यांनी स्पष्ट केलं.

डॉक्टरांच्या टीमकडून पाहणी

नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दोन डॉक्टरांच्या टीमनं घटनास्थळाची पाहणी केली. आता या मृत कावळ्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजेल.’ देशात काही राज्यात बर्ड फ्लू  आढळल्यानं दिल्लीतील कावळ्यांचा संदीग्ध अवस्थेतील मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.

(हे वाचा-लग्नमंडपातून प्रेयसीसोबत पळाला वर, वधूनं उचललं ‘हे’ पाऊल!)

या कावळ्यांच्या मृत्यू थंडी किंवा बर्ड फ्लू ही दोन कारणं असू शकतात, असं टिंकू चौधरी यांनी सांगितलं. बर्ड फ्लूच्या पक्ष्यांचा मृत्यू पाण्याचा साठा असलेल्या ठिकाणांच्या जवळ जास्त होतो. त्यामुळे प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच याचं नेमकं कारण समजणार आहे.

सरकारला तीन दिवसांनंतर जाग?

दरम्यान पार्कमधील कावळ्यांच्या मृत्यूबाबत पार्कच्या माळीनं यापूर्वीच माहिती दिली होता. सरकारी टीम तीन दिवस उशीरा आली आहे, असा आरोपही आता करण्यात येत आहे.

First published:

Tags: Bird flu, Delhi