मुख्यमंत्र्यांवर पत्नीच्या छळवणुकीचा आरोप; पत्नीने विचारलं 'ये कब हुवा?'

मुख्यमंत्र्यांवर पत्नीच्या छळवणुकीचा आरोप; पत्नीने विचारलं 'ये कब हुवा?'

त्रिपुराचे मुख्यमंत्री शुक्रवारी दुपारपासून चर्चेतलं नाव होतं. सुरुवातीला त्यांच्या पत्नीने छळवणुकीचे आरोप केल्याची बातमी आली आणि घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचंही वृत्त आलं, त्यानंतर पत्नीच्या फेसबुक पोस्टवरून झाला खुलासा

  • Share this:

आगरतळा, 26 एप्रिल : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप पत्नीने ठेवल्याची बातमी दुपारी अनेक माध्यमांनी दिली. CNN News18 च्या वृत्तानुसार देव यांची पत्नी नीती यांनी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात छळवणुकीचे आरोप करत पतीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला आहे. पण News18 Lokmat कडे याविषयी ठोस माहिती अद्याप आलेली नाही. दुसरीकडे नीती देव यांच्या फेसबुक अकाउंटवरून मात्र या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात आलं.

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांवर हे आरोप होत असल्याने काही वेळ खळबळ उडाली आहे. बिप्लव देव यांनी गेल्या वर्षीच त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. वेळोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री चर्चेत होतेच, आता या प्रकरणामुळे वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

बिप्लव यांची पत्नी नीती यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत असल्याची केस नोंदवली आहे, असंही काही माध्यमांनी म्हटलं आहे. पण यासंबंधीच्या वृत्तानंतर नीती देव यांच्या फेसबुक अकाउंटवर या सगळ्या बातम्या धादांत खोट्या असल्याची पोस्ट आली. ये कब हुवा, मुझे तो पता भी नही चला? असं विचारत माझं प्रेम निर्मळ आणि निर्हेतुक आहे आणि यासंबंधी कुणाला स्पष्टीकरण द्यायची गरज मला वाटत नाही, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हे फेसबुक अकाउंट नीती देव यांचंच आहे की नाही, यासंबंधी खातरजमा होऊ शकलेली नाही.

 

First Published: Apr 26, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading