Home /News /national /

दुष्टचक्र थांबेना! हेलिकॉप्टर अपघातातील मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात; अनेक पोलीस जखमी

दुष्टचक्र थांबेना! हेलिकॉप्टर अपघातातील मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात; अनेक पोलीस जखमी

CDS जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहे.

    Several policemen were injured in anनवी दिल्ली, 9 डिसेंबर : तमिळनाडूमधील (IAF helicopter crash in Tamil Nadu) हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. रावत, मधुलिका आणि अन्य सर्व मृतांचे मृतदेह मद्रास रेजिमेंट सेंटर येथे आणण्यात आले आहेत. येथून रावत आणि मधुलिका यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येईल. यादरम्यान आणखी एक वृत्त समोर आलं आहे. मृतदेहांना घेऊन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला अपघात झाला असून अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबती अधिक माहिती अद्याप हाती आलेली नाही. बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 13 जणांचं निधन झालं असून कॅप्टन वरुण सिंह बचावले आहेत. मात्र ते या अपघातात खूप जास्त जळाले आहेत. या अपघाताबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. सध्ये वरूण सिंह लाइफ सपोर्टवर असून त्यांना एअर रुग्णवाहिकेने बंगळुरूत शिफ्ट करण्यात येणार आहे. हे ही वाचा-सरकारकडून पुढील सात दिवसांत होऊ शकते नव्या CDS ची नियुक्ती उद्यात दिल्लीत होणार अंत्यसंस्कार... जनरल बिपिन रावत यांचा मृतदेह आज त्यांच्या दिल्ली स्थित घरी पोहोचविण्यात येईल. शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रावत यांच्या दिल्लीस्थित घरात दोघांचे मृतदेह अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल. यानंतर कामराज मार्गावरुन बरार चौकापर्यंत शवयात्रे निघेल, आणि दिल्ली कॅन्टॉन्मेंट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच अपघात.. प्राथमिक माहितीनुसार, सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसोबत एका कार्यक्रमासाठी तमिळनाडूला गेले होते. वेलिंग्टन येथे आर्म्ड फोर्सेजचं कॉलेज आहे. जेथे सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर होतं. तेथून ते हेलिकॉप्टरने कुन्नूर येथे येत असताना कुन्नूर येथे त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. कुन्नूर येथून बिपीन रावत हे दिल्लीला जाणार होते. मात्र, कुन्नूर येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातानंतर लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे त्या परिसरात घनदाट जंगल आहे. या घटनास्थळावरचे फोटोज आणि व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Helicopter, Road accident

    पुढील बातम्या