मराठी बातम्या /बातम्या /देश /

Amazon ने लॉन्च केली अशी बिकीनी; उडाली खळबळ, काही वेळातच प्रॉडक्ट हटवावे लागले

Amazon ने लॉन्च केली अशी बिकीनी; उडाली खळबळ, काही वेळातच प्रॉडक्ट हटवावे लागले

राज्य सरकारकडून याविरोधात कारवाई करणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं,

राज्य सरकारकडून याविरोधात कारवाई करणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं,

राज्य सरकारकडून याविरोधात कारवाई करणार असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं,

  • Published by:  Meenal Gangurde
बंगळुरु, 6 जून : E-commerce कंपनी अॅमेझॉनच्या (Amazon) कन्नडी वेबसाइटवर यूजर्ससाठी कर्नाटकाच्या ध्वजाचा रंग आणि राज्य चिन्ह असलेली बिकिनी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. याविरोधात कर्नाटक सरकारकडून टीका केली जात आहे. राज्यातील कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री अरविंद लिम्बावलीने सांगितलं की, यावर सरकारकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा कन्नडी नागरिकांच्या स्वाभिमानाचा मुद्दा असल्याचं सांगून मंत्री म्हणाले की, सरकार असं कृत्य सहन करणार नाही. अॅमेझॉनला यासाठी माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वी लोकांनी गुगलविरोधात राग व्यक्त केलं होतं. कारण गुगलने कन्नडीला भारतातील सर्वात वाईट भाषा असल्याचं सांगितलं होतं. लिम्बावलीने याबाबत सांगितलं होतं की, काही दिवसांपूर्वी गुगलने कन्नडचा अपमान केला होता. त्यानंतर अॅमेझॉनने कन्नड, कन्नडच्या ध्वजाचा रंग आणि प्रतीक चिन्हाचा महिलांच्या कपड्यासाठी वापर केला आहे. मंत्र्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, बहुराष्ट्रीय कंपन्या कन्नडला वारंवार अपमानित करीत आहे, हे बंद करा. हे कन्नडच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आणि वारंवार होणाऱ्या या घटना आम्ही सहन करणार नाही. मंत्र्यांनी सांगितलं की, त्यांनी कन्नड नागरिकांची माफी मागायला हवी. अॅमेझॉन कन्नडाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. गुगलच्या प्रकरणातही मंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हणाले होते. मात्र कंपनीने माफी मागितल्यानंतर त्यांनी असं केलं नाही. हे ही वाचा-फोटो काढण्याच्या बहाण्याने नवरदेवाला गाडीतून उतरवून केला गोळीबार हा सरकारचा अपमान असल्याचं सांगत माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सरकारकडे अॅमेझॉनविरोधात कारवाई करण्याबाबत गांभीर्याने घेण्यास सांगितले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्यापासून रोखायला हवं. अॅमेझॉनने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
First published:

Tags: Amazon

पुढील बातम्या