भारतातही येणार 'बिकिनी एअरलाइन', लो कॉस्ट विमानसेवा लवकरच मुंबईतूनही घेणार उड्डाण

भारतातही येणार 'बिकिनी एअरलाइन', लो कॉस्ट विमानसेवा लवकरच मुंबईतूनही घेणार उड्डाण

‘बिकिनी एअरलाइन’या नावाने प्रसिद्ध असणारी व्हिएतनाम एअरलाइन्सची ‘Vietjet’ लवकरच भारतात देखील सुरू होणार आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘बिकिनी एअरलाइन’म्हणून प्रसिद्ध असणारी ही एरलाइन भारतामध्ये 5 मार्गांवर आपली सेवा सुरू करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : ‘बिकिनी एअरलाइन’या नावाने प्रसिद्ध असणारी व्हिएतनाम एअरलाइन्सची ‘Vietjet’ लवकरच भारतात देखील सुरू होणार आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘बिकिनी एअरलाइन’म्हणून प्रसिद्ध असणारी ही एरलाइन भारतामध्ये 5 मार्गांवर आपली सेवा सुरू करणार आहे. कमी बजेटमध्ये दिली जाणारी एअरलाइन सुविधा हे वियतजेटचं वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे बिकिनी एअर हॉस्टेस हे वियतजेटचं मुख्य आकर्षण आहे. सुरुवातीला नवी दिल्लीपासून व्हिएतनाममधील हनोई आणि हो ची मिन्ह शहरापर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही एअरलाइन सुरुवातीला 5 फ्लाईट्स सुरु करणार आहे. ज्यामध्ये दिल्ली-मुंबईपासून हनोई, हो ची मिन, दा नँग या शहरांसाठी फ्लाईट्स सुरु करण्यात येणार आहेत. दिल्ली ते दा नँग ही फ्लाईट 14 मे 2020 पासून सुरु होणार आहे. आठवड्यातून 3 दिवस ‘बिकिनी एअरलाइन’सेवा सुरु राहणार आहे.

वाद-विवादात अडकलेली ‘बिकिनी एअरलाइन’

कंपनीची फाउंडर थाओने बिकिनी एअर हॉस्टेसची कल्पना अंमलात आणली होती. त्यानंतर अनेक वादांमध्ये अडकूनही या कंपनीचा 31 हजार 950 कोटींचा व्यवहार आहे. आशियातील 47 देशांमध्ये या कंपनीची सुविधा उपलब्ध आहे. बजेट फ्लाइट हे या कंपनीचं वैशिष्ट्य असल्यामुळे कंपनीला मिळणारा प्रतिसादही चांगला आहे. मात्र जेवढी प्रसिद्धी तेवढ्याच वादांमध्ये ही कंपनी अडकली आहे. नुकतच इंडोनेशियामध्ये या कंपनीला मिळालेल्या प्रतिसादामुळे ही कंपनी प्रकाशझोतात आली होती. इंडोनेशियाकडून स्पष्ट करण्यात आलंय की, जर इंडोनेशियात ‘Vietjet’ येणार असेल तर एअर हॉस्टेस पूर्ण कपड्यातंच येतील.

व्हिएतनाममधील या कंपनीने एअर हॉस्टेसना लाल आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनी घालून प्रमोशनल कँपेन केलं होतं. त्याचप्रमाणे विमानातील एअर हॉस्टेसना बिकिनी शो देखील करावा लागतो. या संपूर्ण करमणुकीमुळे 'बिकिनी एअरलाइन'ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता भारतात या सेवेचं कसं स्वागत केलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: February 14, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading