मराठी बातम्या /बातम्या /देश /गुगल मॅपचा आधार पडला महागात, थेट रेल्वेसमोर घातली गाडी घडला धक्कादायक प्रकार

गुगल मॅपचा आधार पडला महागात, थेट रेल्वेसमोर घातली गाडी घडला धक्कादायक प्रकार

गुगल मॅपद्वारे जात असताना कधीकधी तुम्ही पत्ता चुकू शकता.

गुगल मॅपद्वारे जात असताना कधीकधी तुम्ही पत्ता चुकू शकता.

गुगल मॅपद्वारे जात असताना कधीकधी तुम्ही पत्ता चुकू शकता.

  • Local18
  • Last Updated :
  • Haryana, India

नितिन आंतिल (सोनीपत), 25 मार्च : आपण कुठे अज्ञात स्थळी जात असेन तर पहिल्यांदा गुगल मॅप लावूनच जात असतो. परंतु गुगल मॅपद्वारे जात असताना कधीकधी तुम्ही पत्ता चुकू शकता. दरम्यान असाच एक प्रकार हरियाणामध्ये अनुभवण्यास मिळाला आहे. हरियाणाच्या सोनीपतमध्ये गुगल मॅपच्या आधारी रेल्वे रुळावर थेट वाहन थांबवल्याने मोठा अपघात झाला असता. रेल्वे ट्रॅक ओलांडताना एका व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवरच आपली बाईक थांबवली.

यामुळे मोटारसायकल रेल्वे रुळात अडकली अन् मोठा आवाज झाला. ही रेल्वे दिल्लीहून पानीपतला जात होती या रेल्वेत जवळपास 100 प्रवाशी होते. रेल्वेने ट्रॅक न सोडल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले. जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोटारसायकल बाहेर काढून ट्रेन सुरू केली. रेल्वे पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.

चैत्र नवरात्रीनिमित्त रेल्वेकडून खास भेट, डोंगरगडावर थांबणार 8 एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक

गुगल मॅपचा आधार घेत एक प्रवासी रायहून या गावातून जिंद या गावी जात होता. परंतु तो गुगल मॅपद्वारे गनौरला पोहोचला. नवीनने रेल्वे उड्डाणपुलावरून जाण्याऐवजी रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगवरूनच रस्ता ओलांडला. त्यादरम्यान अचानक रेल्वे आल्याने तो गाडीसह रेल्वेत जात होता. अचानक त्याने गाडी सोडल्याने मोठा अपघात टळला.

माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळ गाठून इंजिनमधून मोटरसायकल काढून रेल्वे सुरू केली. हा अपघात झाल्याने रेल्वे स्टेशनजवळ सुमारे 20 मिनिटे गाडी उभी उशिरा गेल्याचे सांगण्यात आले. सोनीपत आरपीएफ इन्चार्ज युधवीर सिंह यांनी सांगितले की, नवीन नावाचा एक व्यक्ती गुगल मॅपद्वारे गणौर येथे पोहोचला होता.

काय सांगता! गुन्हा केला 19 व्या वर्षी आणि अटक झाली 68 व्या वर्षी, काय आहे प्रकरण?

तो रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याची दुचाकी पलीकडून येणाऱ्या भटिंडा एक्सप्रेसखाली अडकली. त्यानंतर इंजिनखालून बाहेर काढून ट्रेन सुरू करण्यात आली. याच दुचाकीमुळे मोठा अपघात टाळता आला असता. पोलिसांनी आरोपी नवीनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

First published:
top videos

    Tags: Haryana, Local18, Train accident