धक्कादायक ! पत्नीला केलेल्या मारहाणीनंतर 4 महिन्यांच्या मुलाचा 3 लाखांना सौदा

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशमध्ये बापानं चार महिन्यांचा मुलाचा 3 लाखांना सौदा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2019 02:12 PM IST

धक्कादायक ! पत्नीला केलेल्या मारहाणीनंतर 4 महिन्यांच्या मुलाचा 3 लाखांना सौदा

लखनऊ, शकील अहमद 23 जून : सुखी संसाराची स्वप्न रंगवत फरहीन आणि दानिशनं लग्न केलं. सर्व सुरळीत चाललं होतं. दोघांचा संसार सुखानं चालला होता. दोघांमध्ये अधूनमधून खटके देखील उडत होते. लग्नाला वर्ष झालं आणि घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. कारण, फरहीननं एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. पण, त्यानंतर मात्र दानिश हा विचित्र वागू लागला. परहीनला मारहाण करू लागला. दानिशची मजल पोटच्या मुलाचा सौदा करण्यापर्यंत मजल गेली. विश्वास नाही ना बसत? पण, ही धक्कादायक घटना आहे उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील.

दानिशनं पत्नी फरहीनला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यानं फरहीनकडून मुलाला जबरदस्तीनं घेत चार महिन्यांच्या मुलाचा सौदा 3 लाखांना केला. फरहीन आपल्या माहेरी गेली होती. त्यानंतर एके दिवशी दानिश त्या ठिकाणी आला आणि त्यानं फरहीनला जबर मारहाण केली. या मारहाणीत फरहीन जखमी झाली. त्यानंतर दानिशनं फरहीनला रूग्णालयात दाखल केलं आणि 4 महिन्यांचा मुलाचा सौदा 3 लाखांना केला. याप्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण, पोलिसांनी या प्रकरणात कोणताही कारवाई केलेली नाही असा आरोप देखील केला जात आहे.

VIDEO: उद्धव ठाकरेंनी घेतलं साई बाबांचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...