माओवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत, 'सिरियल ब्लास्ट 'करण्याची योजना

माओवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत, 'सिरियल ब्लास्ट 'करण्याची योजना

गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलाने धडक करावाई सुरू केल्याने माओवाद्यांचे धाबे दणाणले असून ते प्रत्युत्तराच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

  • Share this:

रायपूर 19 नोव्हेंबर : माओवादी पुन्हा एकदा सुरक्षा दलाला टार्गेट करण्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा संस्था माओवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असून सुरक्षा दलांवर हल्ल्याचा एक मोठा कट उघडकीस आलाय. यात माओवादी तीन मोठे स्फोट करण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी IED ब्लास्ट करण्याची योजना तयार केली होती. हा कट उघडकीस आला असून सुरक्षा दल सतर्क झालंय. या आधीही सुरक्षा दलांनी माओवाद्यांचे अनेक कट उघडकीस आणले आहेत. हा कट उघडकीस आल्याने सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरुद्धच्या कारवाईचा फेरआढावा घेतला आहे.

वीर सावरकरांना भारतरत्न: केंद्र सरकारने केलं मोठ वक्तव्य!

छत्तीसगडमधल्या बीजापूर इथं हे स्फोट घडविण्याची माओवाद्यांची योजना होती. इथल्या गंगालूर साप्ताहिक बाजारात माओवादी हा स्फोट घडविणार होते. यासाठी त्यांनी तीन IED ब्लास्ट घडवून आणण्याची योजना (IED Bomb Plant) तयार केली होती. हे बॉम्ब सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून ते बॉम्ब निष्क्रिय केले आहेत.

आठवडी बाजारात बॉम्ब ब्लास्ट करून दहशत घडवून आणण्याचीही त्यांची योजना होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. सगळा परिसर पिंजून काढण्यात येत असून सुरक्षा दलं सर्व खबरदारी घेत आहेत. या आधी दंतेवाडा इथं पोलिसांनी एक टिफीन बॉम्ब जप्त केला होता. पोटाली पटेल पारा मार्गावर तब्बल 7 किलोंचा हा बॉम्ब प्लांट करून ठेवला होता.

अयोध्या: मंदिराच्या संपत्तीसाठी 10 'राम' पोहोचले कोर्टात!

गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा दलाने धडक करावाई सुरू केल्याने  माओवाद्यांचे धाबे दणाणले असून ते प्रत्युत्तराच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यामुळे संभाव्य हल्ला परतून लावण्यासाठी सुरक्षा दलांनीही उपयाय योजनाा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 06:24 PM IST

ताज्या बातम्या