मराठी बातम्या /बातम्या /देश /हम दिल दे चुके सनम... पत्नीनं पतीसमोरच केलं आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न, अशी आहे अनोखी प्रेमकथा

हम दिल दे चुके सनम... पत्नीनं पतीसमोरच केलं आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न, अशी आहे अनोखी प्रेमकथा

या लग्नाचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जमुईमधला आहे.

या लग्नाचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जमुईमधला आहे.

या लग्नाचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जमुईमधला आहे.

बिहार, 28 डिसेंबर: सध्या बिहारमधील जमुईमध्ये (Jamui) पतीनं आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकराशी फिल्मी स्टाईलप्रमाणे लग्न लावून दिल्याची घटना चर्चेत आहे. या लग्नाचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पती विकास त्याची पत्नी शिवानी हिचं तिचा प्रियकर सचिनसोबत लग्न लावून देताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ बंगळुरूचा (Bengaluru) असून त्याचा संबंध जमुई जिल्ह्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण 1999 च्या बॉलीवूड चित्रपट (Bollywood Film) 'हम दिल दे चुके सनम' च्या कथेशी जोडले जात आहे, ज्यामध्ये अभिनेता अजय देवगणला त्याची पत्नी ऐश्वर्या रायचे बॉयफ्रेंड सलमान खानशी लग्न करुन द्यायचं होतं, मात्र चित्रपटात तसे होऊ शकले नाही. पत्नीचे प्रियकराशी लग्न झाल्याचं हे प्रकरण आठवडाभरापूर्वीचे असल्याचे सांगितलं जात आहे. न्यूज18 या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

व्हिडिओमध्ये विकास त्याच्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी स्वतःच्या इच्छेने लग्न करण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी, फोटो पाहिल्यानंतर शिवानीच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाल्याचंही तो म्हणत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, शिवानीचे लग्नापूर्वी सचिनसोबत अफेअर होते.

हेही वाचा- मुंबईकरांनो..! 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन संदर्भातली मोठी बातमी 

विकास हा जमुई जिल्ह्यातील सोनो पोलीस स्टेशन हद्दीतील बलथर गावचा रहिवासी आहे. त्यांची पत्नी शिवानी कुमारी या जमुईच्या खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील दानसिंगडीह गावातील रहिवासी आहेत. विकासच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दोन वर्षांपूर्वी त्याने शिवानीशी लग्न केलं होतं.

त्याचवेळी, शिवानीवर पूर्वीपासून प्रेम करणारा सचिन हा मुलगाही जमुई जिल्ह्यातील झझ पोलीस स्टेशन हद्दीतील काबर गावचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर विकास शिवानीसोबत बंगळुरूमध्ये राहत होता. येथे तो एका खासगी कंपनीत काम करतो. शिवानीला शोधत असतानाच त्याचा प्रियकर सचिन बेंगळुरूला आला, जिथे त्याचा काका एका कंपनीत काम करतो.

एके दिवशी जेव्हा विकासला कळले की शिवानी आपल्या प्रियकराला भेटते, तेव्हा त्याने दोघांनाही बसवले आणि समजावले, आणि तुम्हा दोघांनी पुन्हा भेटायचं असं सांगितलं. यावरून विकास आणि सचिनमध्ये अनेक भांडण आणि मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तरीही शिवानीने सचिनला भेटणे थांबवलं नाही. त्यानंतर विकासनं दोघांमधील प्रेम बघून समजूदारपणा दाखवला आणि आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्याचा विचार केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर शिवानीच्या डोक्यामध्ये कुंकू भरत आहे. यावेळी विकासही तेथे उपस्थित होता.

First published:

Tags: Bihar