कोरोना संशयिताना स्क्रिनिंग करण्याचा दिला सल्ला, DMला मिळाली जीवे मारण्याची धमकी

कोरोना संशयिताना स्क्रिनिंग करण्याचा दिला सल्ला, DMला मिळाली जीवे मारण्याची धमकी

डीएमला गोळ्या घालणाऱ्याला 2 लाखांचा इनाम देण्यात येईल अशी त्यांच्या फेसबुक पेजवर कमेंट् करण्यात आली आहे.

  • Share this:

दरभंगा, 04 एप्रिल : संपूर्ण देशात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या जात आहेत. काही लोक मात्र सरकारच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक घटना बिहारच्या दरभंगा परिसरात घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बाहेरून आलेल्या लोकांचं स्क्रिनिंग करण्याचे आदेश देणाऱ्या डीएम डॉ. त्यागराजन यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. IAS ऑफिसर आणि दरभंगाचे डीएम डॉ. त्यागराजन एस. एम यांच्या फेसबुक वॉलवर केलेल्या कमेंटमुळे सर्वत्र बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. डीएमना गोळ्या घालणाऱ्याला 2 लाख रुपयांचा इनाम देण्यात येईल अशी त्यांच्या फेसबुक पेजवर कमेंट् करण्यात आली आहे. या कमेंटचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका माथेफिरूनं ही कमेंट केली असून अद्यापही पोलिसांना त्याला बेड्या ठोकण्यात यश आलं नाही. ज्याने डीएमला गोळ्या घालून दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले त्या व्यक्तीचे फेसबुक अकाऊंटवर मोहम्मद फैसलच्या नावावर आहे. ही वादग्रस्त टिप्पणी समोर आल्यानंतरही अद्यापही हा माथेफिरू मोकाट फिरत आहे.

या फेसबुक अकांऊटची आणि डीए यांच्या पोस्टवरील कमेंटची सविस्तर तपासणी केली असता हा माथेफिरू दरभंगा इथल्या दिधियार गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्याने आतापर्यंत स्वत: चे कोणतेही फोटो फेसबुक अकाऊंटमध्ये ठेवले नाहीत, किंवा या अकाउंटवर त्याचा चॅट हिस्ट्री ठेवली नाही. त्यामुळे हे अकाऊंट फेक आयडीनं तयार करण्यात आलं आहे का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.

हे वाचा-'गोळ्या घालून ठार करा', मरकजवाल्यांवर कसे भडकले राज ठाकरे? पाहा VIDEO

एसएसपीने सुरू केली कारवाई

दरभंगाचे एसएसपी बाबूराम यांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकण्याच्या मुद्यावरून कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पोलिसांनी सायबर सेलला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. त्यागराजन एस. एम यांनी या संदर्भात लेखी अर्ज दिला आहे की हे वादग्रस्त पोस्ट त्यांच्या अधिकृत फेसबुकवर पोस्टवर केली गेली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

डॉ. त्यागराजन एस. एम कोण आहेत?

या आधी डॉ. त्यागराजन हे नालंदा इथे काम करत होते. त्यांची 2 फेब्रुवारी 2019 रोजी दरभंगा इथे डीए म्हणून नियुक्ती झाली.

2011 च्या पासआऊट बॅचमधील ते आयएएस ऑफिसर आहेत.

दिल्लीतील विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

तत्काळ निर्णय घेऊन त्याची कठोर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं अंमलबजावणी करणारे ऑफिसर अशी त्यांचे ओळख आहे.

नालंदा कार्यालयात त्यांनी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती.

दरभंगा इथे डीएम डॉ. चंद्रशेखर सिंह यांच्यानंतर त्यांनी बिहारमध्ये या परिसराचा डीएम म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हे वाचा-शरद पवार 'इन अ‍ॅक्शन', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली फोनवरून चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 01:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading