मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्टेशनवर उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला भीषण आग, तीन डब्बे भक्ष्यस्थानी; आगीचा Live Video

स्टेशनवर उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला भीषण आग, तीन डब्बे भक्ष्यस्थानी; आगीचा Live Video

रेल्वे स्थानकावर (Train Caught Fire) शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग (fire broke out) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
बिहार, 19 फेब्रुवारी: बिहारमधील (Madhubani railway station) मधुबनी रेल्वे स्थानकावर (Train Caught Fire) शनिवारी सकाळी अचानक उभ्या असलेल्या ट्रेनला आग (fire broke out) लागली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसमध्ये आग लागली आहे. काही वेळातच आगीची तीव्रता वाढली आणि ट्रेननं पेट घेण्यास सुरुवात केली. सुदैवाने ट्रेनला आग लागली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती. स्थानकावर उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभ्या असलेल्या स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेसच्या बोगीला शनिवारी सकाळी 9 वाजता आग लागली. आतापर्यंत दोन डबे जळाल्याचं सांगण्यात येत आहे. तर तिसरी बोगीही आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. जयनगर येथून रेल्वेचा रेक येथे आणण्यात आला. सदरचे एसडीओ अश्विनी कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव कुमार, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित कुमार यांच्यासह पथक रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टेशनवर मोठी गर्दी जमली आहे. रिकाम्या कोचला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी होणार : सीपीआरओ पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार म्हणाले, शनिवारी सकाळी 09.13 वाजता समस्तीपूर विभागातील मधुबनी रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनच्या डब्यात आग लागली. तत्काळ कारवाई करत 09.50 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.  बताया जा रहा कि स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस रात में ही दिल्ली से ये ट्रेन मधुबनी पहुंची थी और स्टेशन में खड़ी रहने के दौरान इसमें आग लगी. तुरंत ही स्टेशन मौजूद लोगों और कर्मियों ने आग बुझाने की कवायद शुरू की. इस बीच फायर ब्रिगेड की टीम भी मौके पहुंची और आग पर काबू पाने में जुट गए. रॅक बंद अवस्थेत होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास जीआरपी आणि आरपीएफ करत आहे. याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत, असं वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं.
First published:

Tags: Bihar, Burning train, Fire

पुढील बातम्या