S M L

बिहारमध्ये पत्रकार परिषदेत बंदूक दाखवताच उमेदवाराच्या घरावर पोलिसांचा छापा

सामाजिक शांतता भंग केली तर याद राखा असा इशाराच पोलिसांनी गुंडगिरी करणाऱ्या उमेदवाराला दिलाय.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 07:15 PM IST

बिहारमध्ये पत्रकार परिषदेत बंदूक दाखवताच उमेदवाराच्या घरावर पोलिसांचा छापा

पाटणा 22 मे : पत्रकार परिषदेत चक्क बंदूक उंचावून हिंसाचाराची धमकी देणाऱ्या एका उमेदवाराच्या घरावर पोलिसांनी छापा घातला. भभुआ चे माजी आमदार आणि बक्सर मधून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले रामचंद्र यादव हे आज बंदूक घेऊनच पत्रकार परिषदेत आले होते. या पत्रकार परिषदेनंतर ही बातमी लगेच सगळीकडे पसरली. त्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी यादव यांच्या घरावर छापा घालून झडती घेतली.

रविवारी संपलेल्या मतदानानंतर 'एक्झिट पोल' जाहीर झाले आणि विरोधी पक्षांची झोपच उडाली. जाहीर झालेल्या सर्वच पोल्समध्ये भाजप आणि एनडीएला बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे सत्तेत येण्याची आस लावून बसलेल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झालाय. त्यामुळे बिथरलेल्या बिहारच्या नेत्याने चक्क शस्त्रच हातात घेण्याचं आवाहन केलं मंगळवारी केलं होतं. त्यानंतर आज एका अपक्ष उमेदवाराने पत्रकार परिषदेतच बंदूक दाखवून संघर्षासाठी तयार असल्याचं सांगितलं.




पत्रकार परिषदेत बंदूक

राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सशस्त्र संघर्षाचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भभुआ चे माजी आमदार आणि बक्सर मधून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले रामचंद्र यादव हे आज बंदूक घेऊनच पत्रकार परिषदेत आले. लोकशाहीच्या रक्षणासाठी बंदुकीचा वापर करायला तयार असल्याचं ते म्हणाले. महाआघाडीच्या नेत्यांनी फक्त आदेश द्यायला उशीर आहे असंही त्यांनी सांगितलं. छापा घातल्यानंतर पोलिसांनी यादव यांना सक्त ताकिद दिली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Loading...

यावर बिहारमध्ये जोरदार राजकारण सुरू झालंय. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने यावर टीका केलीय. आम्ही संघर्षासाठी तयार आहोत असंही त्यांनी सांगितंल.

काय म्हणाले उपेंद्र कुशवाह?

'एक्झिट पोल'मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भुमिका स्पष्टकरण्यासाठी पाटण्यात मंगळवारी पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी सर्व एक्झिट पोल हे खोटे असल्याचं सांगितलं. पहिले बुथ लुटण्यात आले, आता निकालांची लूट करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अशा वेळी गरज पडली तर महाआघाडीच्या नेत्यांनी शस्त्र हातात घेण्यास मागेपुढे पाहु नये असं आवाहनही त्यांनी केलं.

कुशवाह एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, लोकांचा आक्रोश हा अतिशय वाईट असतो. रस्त्यावर रक्त सांडू शकते. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. असं काही झालं तर त्यासाठी एनडीएचे नेतेच जबाबदार असतील. कुशवाह यांच्या या भुमिकेवर टीका होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 07:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close