मराठी बातम्या /बातम्या /देश /पतीचं कोरोनानं निधन, आतोनात प्रेमापोटी आत्महत्या करत पत्नीनं दोन चिमुरड्यांना केलं अनाथ

पतीचं कोरोनानं निधन, आतोनात प्रेमापोटी आत्महत्या करत पत्नीनं दोन चिमुरड्यांना केलं अनाथ

Bihar woman suicide रिता यांनी पतीला सोबत जगण्या मरण्याचं दिलेलं वचन अगदी तंतोतंत पाळलं. पण त्यांच्या दोन चिमुकल्यांचा त्यांनी विचार केला नाही. या प्रकारामुळं आता 3 वर्षांचा प्रियांशू आणि अवघा तीन महिन्यांचा शिव्यांश यांना अनाथाप्रमाणं जीवन जगावं लागेल.

पुढे वाचा ...

समस्तीपूर(बिहार), 04 जून : पतीवर असलेल्या आतोनात प्रेमापोटी एका महिलेनं तिच्या दोन चिमुरड्यांच्या भवितव्याचा विचार न करता (Woman commits suicide after husbands Death) आत्महत्या केली. कोरोनाची लागण (Corona infection) झाल्यामुळं या महिलेच्या पतीचा मृत्यू (Husband death) झाला होता. पण त्यामुळं पत्नी प्रचंड नैराश्यात गेली होती. तिनं अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला पण त्यामुळं दोन चिमुकल्या मुलांना आता संपूर्ण आयुष्य अनाथासारखं जगावं लागणाक आहे.

(वाचा-12 वीच्या विद्यार्थ्यांना कोरोना लस देणार का? मोदी सरकारने कोर्टात दिलं उत्तर)

बिहारच्या समस्तीपूर येथील मंजित कुमार आणि त्यांच्या कॉन्स्टेबल असलेल्या पत्नी रिता कुमारी यांची ही कहाणी आहे. मंजित कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारासाठी त्यांना बेगूसराय इथं दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान 11 मे रोजी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी रिता यांचा प्रचंड धक्का बसला होता. मंजित यांचे मोठे भाऊ संजीव कुमार यांनी सांगितलं की, रिता या नैराश्यात होत्या.

(वाचा-पुणेकरांसाठी गुड न्यूज! रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक, लसीकरण 11 लाखांच्या वर)

बुधवारी सकाळी रिता त्यांच्या तीन वर्षाच्या प्रियांशू कुमार आणि तीन महिन्याच्या शिव्यांश यांच्यासह झोपलेल्या होत्या. काही वेळानं मुलं जेव्हा त्यांच्यापासून वेगळी झाली, तेव्हा त्या पुन्हा खोली बंद करून झोपून गेल्या. त्यानंतर दुपापर्यंत त्या बाहेर आल्या नाही म्हणून कुटुंबीयांनी खोली उघडण्याचा प्रयत्न केला. आतून आवाज येत नसल्यानं त्यांनी अखेर दरवाजा तोडला, तर समोरचं चित्र अत्यंत भयावह होतं. रिता यांनी गळफास घेतला होता. त्यानंतर पोलिसांना माहिती देत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली.

तीन महिन्यांपूर्वीच रिता यांनी चिमुकल्या शिव्यांशला जन्म दिला होता. त्यामुळं त्यांची प्रसुतीरजा सुरू असल्यानं त्या सुटीवर होत्या. रिता यांनी पतीला सोबत जगण्या मरण्याचं दिलेलं वचन अगदी तंतोतंत पाळलं. पण त्यांच्या दोन चिमुकल्यांचा त्यांनी विचार केला नाही. या प्रकारामुळं आता 3 वर्षांचा प्रियांशू आणि अवघा तीन महिन्यांचा शिव्यांश यांना अनाथाप्रमाणं जीवन जगावं लागेल.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Woman suicide