Home /News /national /

पावसाच्या प्रतीक्षेत असताना निसर्गाचा भयंकर घाला; एकाच दिवसात एकाच राज्यात वीज पडून 83 जणांचा मृत्यू

पावसाच्या प्रतीक्षेत असताना निसर्गाचा भयंकर घाला; एकाच दिवसात एकाच राज्यात वीज पडून 83 जणांचा मृत्यू

मान्सूनचे वारे देश व्यापत असल्याची चांगली बातमी येत असतानाच निसर्गाचा दुर्दैवी फटका उत्तर भारतात काही भागात विशेषतः बिहारमध्ये बसला आहे.

    पाटणा, 25 जून : मान्सूनचे वारे देश व्यापत असल्याची चांगली बातमी येत असतानाच निसर्गाचा दुर्दैवी फटका उत्तर भारतात काही भागात विशेषतः बिहारमध्ये बसला आहे. पावसानं काही भागात थैमान घातलं. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने बिहारमध्ये एकाच दिवसात 83 जणांचा जीव घेतला. भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे. पुढच्या 48 तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ढग आणि पावसाची लक्षणं दिसल्यावर लोकांना आपापल्या घरातच राहाण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे. 83 मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत नितीश कुमार यांनी जाहीर केली आहे. गुरुवारी बिहारमध्ये सर्वदूर चांगला पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने ग्रामीण भागात हाहाकार उडाला. गोपालगंज जिल्ह्यात वीज पडून सर्वाधिक 14 बळी गेले. सुशांतच्या चाहत्यांसाठी खुशखबर; फ्रीमध्ये पाहता येणार त्याचा शेवटचा चित्रपट मधुबनी आणि नवादा जिल्ह्यातही प्रत्येकी 8 जणांचा मृत्यू झाला. सीवान आणि भागलपूरमध्ये प्रत्येकी 6 तर दरभंगा, पूर्व चंपारण आणि बांका जिल्ह्यांत 5-5 व्यक्तींचा मृत्यू झाला. खगडिया आणि औरंगाबादमध्ये 3 लोक मृत्युमुखी पडले. सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रियंका गांधी अडचणीत; बाल संरक्षण आयोगाची नोटीस याशिवाय पश्चिम चंपारण, किशनगंज, जहानाबाद, जमुई, पूर्णिया, सुपौल, कैमूर व बक्सर मध्ये प्रत्येकी 2-2 लोकांचा बळी गेला. मस्तीपुर, शिवहर, सारण, सीतामढी आणि मधेपुरा इथेही मनुष्यहानी झाली आहे. बिहारच्या 12 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारसाठीसुद्धा रेड अलर्ट जारी केलेला आहे. संकलन - अरुंधती
    First published:

    Tags: Bihar (Indian State), Lightning

    पुढील बातम्या