मराठी बातम्या /बातम्या /देश /

बिहारमध्येही 'महाविकासआघाडी', 7 पक्षांच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री!

बिहारमध्येही 'महाविकासआघाडी', 7 पक्षांच्या पाठिंब्याने नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री!

महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) महाविकासआघाडीचा प्रयोग पुन्हा एकदा झाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी भाजपची साथ सोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

    पाटणा, 9 ऑगस्ट : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) महाविकासआघाडीचा प्रयोग पुन्हा एकदा झाला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी भाजपची साथ सोडत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना भेटून नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. राज्यपालांकडे राजीनामा देतानाच नितीश कुमार यांनी आमदारांच्या समर्थनाचं पत्रही राज्यपालांना दिलं आहे. बिहारच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 7 पक्षांचे 164 आमदार आणि अपक्षांच्या मदतीने बिहारमध्ये महागठबंधन सरकार बनवत असल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. यावेळी नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादवही होते. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी राज्यपाल तारीख देतील, असं नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार यांना कोणाचं समर्थन? बिहारमध्ये आरजेडीचे 79, जेडीयूचे 45, काँग्रेसचे 19, डाव्यांचे 16 आणि एक अपक्ष असं 160 चं संख्याबळ आहे. या पक्षांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. बिहारचं पक्षीय बलाबल 2020 च्या निवडणुकीत 243 जागांच्या बिहार विधानसभेत एनडीएला 125 जागांवर काठाचं बहुमत मिळालं होतं. भाजपला 74 तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 43 जागा, विकासशील इनसान पार्टीला 4 आणि हिंदूस्तान आवाम पार्टी सेक्युलरला 4 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे आरजेडी आणि त्यांच्या घटकपक्षांना 110 जागांवर यश मिळालं होतं. आरजेडी 75 जागांसह बिहारमधली सगळ्यात मोठी पार्टी ठरली. तर काँग्रेसला 19 जागा आणि डाव्यांना 16 जागा मिळाल्या. ओवेसींच्या एमआयएमचे 5 आमदारही बिहारमध्ये निवडून आले, यातले 4 आमदार आरजेडीमध्ये गेले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Bihar, Nitish kumar

    पुढील बातम्या