Air Strikeचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, काय म्हणाले वाचा

Air Strikeचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, काय म्हणाले वाचा

Air Strikeचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

  • Share this:

पाटणा,03मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (3 मार्च) बिहारची राजधानी पाटणामध्ये आगामी निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. पाटणातील ऐतिहासिक गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकल्प रॅलीमध्ये भाषण केले. यावेळेस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान देखील हजर होते. सभेदरम्यान पंतप्रधान मोदींनी एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईचे पुरावे सादर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. यावरुन पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'विरोधक पूर्वी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते आता एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. आपल्या वीर जवानांनी जो पराक्रम गाजवला आहे, त्यावर शंका उपस्थित केली जात आहे. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते, त्याचप्रमाणे आता हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचे पुरावे मागितले जात आहेत. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आपल्या जवानांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कशासाठी करत आहेत?. ज्या विधानांमुळे आपल्या देशाच्या शत्रूंना फायदा होईल अशी विधानं त्यांच्याकडून का केली जात आहेत?', असे प्रश्न उपस्थित करत मोदींनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले.

पंतप्रधान मोदी पुढे असंही म्हणाले की, ''काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जागतिक स्तरावर आपला आवाज पोहोचू शकले नाहीत. विरोधक म्हणतात मोदींना हटवा. पण मी म्हणतो दहशतवाद हटवा. ते म्हणतात एकत्र येऊन मोदींना घालवा, पण मी म्हणतो चला एकत्र येऊन भ्रष्टाचार मिटवू''

दरम्याव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईचे पुरावे मागितले होते. यावरुनच मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'आताचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. अमेरिकेनं दहशतवादी लादेनचा खात्मा केल्यानंतर याचे पुरावे दिले. सॅटेलाईटद्वारे मिळणाऱ्या फोटोंच्या सहाय्याने आपणही एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत', असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले.

VIDEO : 'अमेरिका लादेनबाबत पुरावे देतं तर आपण AIR STRIKE चे का नाही?'

वाचा संबंधित बातम्या :

जैशच्या संपर्कात पाकिस्तान; कुरेशींच्या 'त्या' उत्तरानं पाकिस्तानचा बनाव उघड

काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ, दोन दहशतवाद्यांमागे एक जवान होतोय शहीद

First published: March 3, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading