Home /News /national /

सासऱ्यावर जडलं प्रेम, दोन मुलांना टाकून फरार; निराश झालेल्या पतीनं उचललं टोकाचं पाऊल

सासऱ्यावर जडलं प्रेम, दोन मुलांना टाकून फरार; निराश झालेल्या पतीनं उचललं टोकाचं पाऊल

एक महिला आपल्या सासऱ्यासोबत पळून गेली आहे. परसा बाजार पोलीस (Parsa Bazar police station) ठाण्याच्या कुरथौल (Kurthaul village) गावात एक विचित्र घटना समोर आली आहे.

    पाटणा, 22 मे: बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एक महिला आपल्या सासऱ्यासोबत पळून गेली आहे. परसा बाजार पोलीस (Parsa Bazar police station) ठाण्याच्या कुरथौल (Kurthaul village) गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. कुरथौल गावातील दोन मुलांची आई तिच्या चुलत सासऱ्यासोबत बुधवारी पळून गेली. दोन्ही मुलांना सोडून पळून गेलेल्या पत्नीमुळे नाराज झालेल्या पतीने गुरुवारी परसा बाजार पोलीस ठाण्यात जाऊन मदतीची याचना केली. पोलिसांना सांगितलं की, माझ्या पत्नीचे गावातील चुलत सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मी विरोध केला असता काकानं मला जीवे मारण्याची धमकी दिली. तीन दिवसांपूर्वी पत्नी दोन मुलांना सोडून चुलत सासऱ्यासोबत पळून गेली. या प्रकरणी पोलिसांना काही करता आलं असतं की, पोलीस ठाण्यातून परतलेल्या पतीने शुक्रवारी विष प्राशन केले. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी या पळून गेलेल्या पत्नीच्या पतीचा मृत्यू झाला. ''यांनीच  MIM ला मोठं केलं'',  Raj Thackeray यांची शिवसेनेवर आगपाखड घटनेच्या संदर्भात मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं की, कुंदन सिंग त्याच्या वडिलोपार्जित घरी दोन मुले आणि पत्नीसोबत कुरथौल येथे राहत होता. यावेळी कुंदनचे गावातील काका जसवंत सिंह त्यांच्या घरी येत असत. घरी येण्याच्या ओघात कुंदनच्या पत्नीचे काका जसवंत सिंग यांच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांच्या नात्याची संपूर्ण गावात चर्चा होऊ लागली. कुंदन सिंग यांनी पारसा बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्ररीत सांगितलं की, जसवंत सिंगच्या पत्नीसोबतच्या अवैध संबंधांमुळे तो खूप नाराज होता. पोलीस स्टेशनमधून घरी आल्यावर त्याला परिसरातील लोकांचे टोमणे सहन न झाल्यानं त्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचं लोकांनी सांगितलं. Raj Thackeray In Pune: भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला हॉस्पिटलमध्ये कुंदनने पोलिसांना जबाब दिला की, माझ्या पत्नीचे जसवंत सिंगसोबत अवैध संबंध होते आणि ती काकासोबत पळून गेली. त्यामुळे नाराज होऊन मी विष प्राशन केलं आहे. त्याचवेळी कुंदन सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात पारसा बाजार पोलीस स्टेशनचे प्रभारी माशूक अली यांनी सांगितले की, कुंदनच्या जबानीवरून जसवंत सिंग आणि त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bihar, Love

    पुढील बातम्या