पत्नी आणि मुलीची हत्या करून उद्योगपतीने केली आत्महत्या

पत्नी आणि मुलीची हत्या करून उद्योगपतीने केली आत्महत्या

निशांतचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात होता. त्याची थोडी हालचाल दिसल्याने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

  • Share this:

पाटना 11 जून :  बिहारची राजधानी पाटण्यात मंगळवारची सकाळ उजाडली तीच एका थरारक घटनेने. एका घरात तीन शव मिळाल्याने पूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय झालं याचा शोध जेव्हा पोलीस घेत होते तेव्हा ही हत्या आणि आत्महत्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पाटण्याच्या किदवपूरी विभागात ही घटना घडल्याने शहर हादरून गेलंय. निशांत सराफ या 37 वर्षांच्या उद्योगपतीचं पाटण्यात कापडाचं मोठं दुकान आहे. पाटण्यातील मोठ्या व्यावसायीकांमध्ये त्यांची गणना केली जाते.

निशांतला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मंगळवारी सकाळी उशीरापर्यंत निशांत यांच्या घरात कुठलीही हालचाल झाली नाही त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना केली. पोलिसांनी जेव्हा घराचं दार तोडून प्रवेश केला तेव्हा त्यांना भयानक दृष्य दिसलं.

निशांत त्याची बायको आणि एक मुलगी मृतावस्थेत आढळून आले. तर निशांतचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात होता. त्याची थोडी हालचाल दिसल्याने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. निशांतच्या बाजूलाच आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडल्याने सगळा खुलासा झाला. निशांत याने बायको आणि दोन मुलींची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.

निशांतला आपलं सर्व कुटुंबच संपवायचं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. निशांतने हे अमानुष कृत्य का केलं याचा तपास पोलीस करत आहेत. आर्थिक अडचण किंवा कौटुंबीक ताण-तणावातून त्याने हे केलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

First published: June 11, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading