Home /News /national /

भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 भारतीय नागरिक जखमी

भारत-नेपाळ सीमेवर पोलिसांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, 4 भारतीय नागरिक जखमी

नकाशावरून सध्या भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

    सीतामढ़ी, 12 जून : भारत आणि नेपाळ सीमेवरील तणाव आणखीन वाढताना दिसत आहे. सीमेवर नेपाळच्या पोलिसांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये 4 भारतीय नागरिकांना गोळी लागली असून एकाचा मृत्यू झाला आहे. भारतातील काही भाग हे नेपाळचे असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात असल्यानं सीमारेषेवर तणावाचं वातावरण आहे. गोळी लागल्यानं जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. चारही भारतीय नागरिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीतामढीच्या जानकीनगर गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार भारत-नेपाळ सीमेवर वाद झाला होता त्यानंतर नेपाळ पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हे वाचा-कोरोनाच्या संकटात RBIकडून आणखी एका बँकेवर कारवाई, ग्राहकांना पैसे काढण्यास बंदी नकाशावरून सध्या दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वाटाघाटीपूर्वी नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे. नेपाळच्या नवीन नकाशामध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे. नेपाळने आपल्या नकाशामध्ये काळापाणीचे 60 चौरस किलोमीटर क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने 395 चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला दावा सांगितला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या सीमारेषेवरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. हे वाचा-2 लहान पिल्लांना कुर्‍हाडीने केले ठार, अस्वलीने जे केलं त्यामुळे गाव हादरले हे वाचा-लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा, जनतेलाही केलं आवाहन संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Nepal, PM narendra modi

    पुढील बातम्या