मराठी बातम्या /बातम्या /देश /

नितीश कुमार पुन्हा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्तास्थापनेसाठी बिहारमध्येही महाराष्ट्राचाच फॉर्म्युला!

नितीश कुमार पुन्हा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्तास्थापनेसाठी बिहारमध्येही महाराष्ट्राचाच फॉर्म्युला!

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांना सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्या दुपारी 2 वाजता नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

    पटणा, 9 ऑगस्ट : बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांना सरकार बनवण्याचं आमंत्रण दिलं आहे. उद्या दुपारी 2 वाजता नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर आरजेडीचे (RJD) तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तसाच फॉर्म्युला जेडीयू आणि आरजेडी सत्ता स्थापन करताना वापरणार आहे. बिहारच्या राजभवनाच्या राजेंद्र मंडपमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच शपथ घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बिहारमध्येही तयार होते 'शिंदे,' 'शिवसेना' व्हायची भीती ओळखून नितीशनी सोडली भाजपची साथ! राज्यपालांच्या भेटीमध्ये नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल फागू चौहान यांना दिलं आणि सरकार स्थापनेचा दावा केला. नितीश कुमार यांचं पत्र मिळाल्यानंतर राज्यपालांनी तत्काळ सरकार बनवण्यासाठी सरकारला आमंत्रण दिलं नाही, पण काही काळानंतर त्यांनी या महागठबंधनला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं. यानंतर बुधवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील हे ठरलं. या महागठबंधन सरकारमध्ये जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, डावे आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीएला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमारांना विचारात न घेता आरसीपी सिंग यांना केंद्रीय मंत्री बनवलं हे सांगणं खोटं आहे. भाजपचा जेडीयूला तोडण्याचा प्रयत्न आहे हेदेखील खोटं आहे. ते युती तोडण्याचं कारण शोधत होते. भाजप 2024 साली प्रचंड बहुमताने निवडून येईल, असं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या