Elec-widget

पोलिसांनी व्यापाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये ओतले पेट्रोल

पोलिसांनी व्यापाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये ओतले पेट्रोल

  • Share this:

बिहार, 11 आॅगस्ट : गुन्हेगारीने बदनाम असलेल्या बिहारमध्ये पोलिसांच्या विकृतीचा प्रकार समोर आलाय. लाच दिली नाही म्हणून एका व्यापाराला बेदम मारहाण करून त्याच्या प्राईवट पार्टमध्ये पेट्रोल ओतल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. व्यापारी राजेश वर्मा (नाव बदलले) यांनी कोर्टात हा धक्कादायक खुलासा केलाय. पोलिसांनी या व्यापाऱ्याकडे 50 हजारांची लाच मागितली होती. कोर्टाने या पीडित व्यापाऱ्याच्या वैद्यकीय चौकशीचे आदेश दिले असून आरोपी पोलिसांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

9 आॅगस्ट रोजी ही घटना घडली. राजेश वर्मा (नाव बदलले) यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. वर्मा हे आपल्या दुकान हजर होते. तेव्हा पोलीस अधिक्षक सुनील कुमार यांची टीम तिथे आली. त्यांनी 50 हजारांची मागणी केली ती देण्यास नकार दिला म्हणून पोलिसांनी दुकानातच मारहाण सुरू केली. त्यानंतर वर्मा यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि कोठडीत टाकलं. हा प्रकार इथंच थांबला नाही. मध्यरात्री पोलिसांनी पुन्हा एकदा वर्मा यांना मारहाण केली. पोलिसांनी त्यांचे कपडे उतरवले आणि पार्श्वभागात पेट्रोल ओतले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आमच्याविरोधात तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली.

एवढंच नाहीतर जेव्हा वर्मा यांना दुकानात मारहाण करण्यात आली तेव्हा पोलिसांनी दुकानाच्या गल्ल्यातून 5 हजाराची रोकडही लंपास केली. एका मारहाणीच्या प्रकरणात वर्माला पोलीस अटक करण्यासाठी आले होते. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल आहे अशी माहितीही त्यांनी केली. पण कोर्टाने याची दखल घेतली नाही असंही त्यांनी सांगितलं. आपल्यावर झालेल्या घटनेबाबत वर्माने वरिष्ठ पोलीस अधिकारी, मानवधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केलीये.

हेही वाचा

Loading...

PHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख

पाॅर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी अफगाणिस्तानच्या मुलीनं सोडला धर्म

'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड 

VIDEO : पक्ष्यांच्या विष्ठेचा वास येतो म्हणून झाडं तोडली, दोनशे पिल्लं हकनाक मेली

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...