नालंदा, 25 मे : बिहारच्या नालंदा (Nalanda)मधील सोहसराय ठाण्याच्या हद्दीतील बंधू बाजार परिसरातून एक अजब बातमी समोर आली आहे. बंधु बाजारमधील निवासी मनोज पंडित यांचा मुलगा विकास याचा सोमवारी रात्री विवाह झाला. रात्री विवाह झाला आणि त्यानंतर सकाळी नवरी (Bride)सासरी पोहोचली. पण अचानक नवरीची तब्येत एवढी बिघडली की, गृहप्रवेशाआधीच तिचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.
(वाचा-VIDEO: अल्पवयीन मुलाला अधिकाऱ्यांकडून मारहाण; कारण ऐकून आयुक्तही वैतागले)
बिहारच्या नवादा परिसरातील रहिवासी गोपाल पंडित यांची मुलगी आरती हिचा विवाह बिहारशरीफ येधील सोहसराय बंधु बाजारमधील मनोज पंडित यांचा मुलगा विकासबरोबर सोमवारी झाला. त्यावेळी सर्वकाही ठिक होतं. त्यानंतर लग्नानंतर नवरीला वाटी लावण्यात आलं आणि वऱ्हाडाबरोबर नवरी मंगळवारी पहाटे घरी आली. त्यावेळी नवरी घरी आल्यानंतर तिला गाडीतून खाली उतरवण्याचीच तयारी सुरू होती, पण तेवढ्यात तिची तब्येत बिघडली आणि पाहता पाहता आनंदाचं वातावरण पूर्णपणे शोकाकुल झालं.
(वाचा-चित्रपटांना रामराम करत 'या' अभिनेत्रीनं धरली गावाची वाट, कोकणात फुलवली शेती)
रुग्णालयात पोहोचण्याआधीच मृत्यू
लग्नानंतर नवरदेव नवरी घरी पोहोचले तेव्हा नातेवाईक गृहप्रवेशाची तयारी करत होते. कुटुंबातील महिला लग्नातील एक विधी म्हणजे 'गाल सिकाई' करत होत्या. पण त्याचवेळी नवरीची तब्येत अचानक बिघडली आणि घाई घाईत नातेवाईत तिला घेऊन रुग्णालयात गेले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. कोरोनाच्या भीतीने सर्व घाबरलेले होते. पण कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
पोटदुखीकडे दुर्लक्ष महागात पडले
मृत आरतीचा भाऊ म्हणाला की, लग्नाच्या दिवशी तिच्या पोटात दुखत होतं. तिला उल्टीदेखिल झाली होती. पण सगळेच लग्नाच्या घाईत होते. त्यामुळं किरकोळ काहीतरी असेल असं समजून कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. पण सासरी पोहोचताच तिची तब्येत जास्त खराब झाली आणि तिचा मृत्यू झाला. नवरीच्या मृत्यूनंतर सगळ्यांनाच धक्का बसला. काही तासांपूर्वी ज्या लेकीला सासरी जाण्यासाठी निरोप दिला तिला असा कायमचा निरोप द्यावा लागल्यानं सगळेच प्रचंड दुःखात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.