दुचाकीच्या टाकीतून निघाल्या दारूच्या बाटल्या, VIDEO पाहून व्हाल हैराण

दुचाकीच्या टाकीतून निघाल्या दारूच्या बाटल्या, VIDEO पाहून व्हाल हैराण

  • Share this:

छपरा, 04 जुलै : देशभरात कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर दारूवर बंदी घालण्यात आली होती. अनलॉक झाल्यावर ऑनलाइन दारुविक्री सुरू करण्यात आली असली तरीही उत्तर प्रदेशात मात्र दारूबंदी आहे. बिहारमधून उत्तर प्रदेशात दारू तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हा प्रकार पाहून पोलीस आणि लोकही चक्रावले. दुचाकीच्या टाकीत एक छुपा बॉक्स तयार करण्यात आला होता. या टाकीच्या आतून दारूची तस्करी केली जात होती. पोलिसांनी बलिया मोरजवळ दुचाकीस्वाराला या दारूसह तस्करी करताना पकडलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-वाघापासून कुत्र्याला वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं केला इंडियन जुगाड, पाहा PHOTO

हे वाचा-VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि...

पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना तस्करीची माहिती मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी सापळा लावून दारू तस्करी करणाऱ्या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं आहे. र्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत जेव्हा दारू तस्कर मोठ्या वाहनांमध्ये तळघर बांधून दारूची तस्करी करीत होते. पण अशाप्रकारे पहिल्यांदाच तस्करी झाल्यानं पोलीसही चक्रावले.

दुचाकीस्वार पोलिसांची नजर चुकवून फरार होण्याच्या तयारीत होता मात्र हा प्लॅन अपयशी झाल्यानं दुचाकी, दारू आणि दुचाकीस्वारही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: July 4, 2020, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading