कन्हैया कुमारची देशाच्या राजकारणात एण्ट्री, बिहारमधून लढणार निवडणूक

कन्हैया कुमारची देशाच्या राजकारणात एण्ट्री, बिहारमधून लढणार निवडणूक

सध्या बेगुलराय येथे भाजपची सत्ता आहे

  • Share this:

बिहार, ०२ सप्टेंबर- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आता देशाच्या राजकारणात प्रवेश करायला सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी कन्हैय्या बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. कन्हैय्याने लोकसभा निवडणूक लढवावी असं डाव्या संघटनेचं एकमत झाल्यानेच त्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैय्या बिहारच्या बेगूसराय येथून सीपीआयच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवेल. काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटनेसोबतच्या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमार निवडणूक लढवणार असेल म्हटले जात आहे. विशेष म्हणजे कन्हैय्याच्या राजकीय प्रवेशाबद्दल लालू प्रसाद यादव यांना सांगण्यात आले असून त्यांनीही कन्हैय्याला हिरवा कंदील दाखवला आहे.

कन्हैय्याने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. सध्या बेगुलराय येथे भाजपची सत्ता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपचे भोला सिंह निवडणून आले होते. आता २०१९ च्या निवडणूकीत काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. स्वतः कन्हैय्या कुमारने बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि डावी संघटना एकत्र आली तर मी नक्कीच निवडणूक लढवेन असे सांगितले होते. त्याच्या म्हणण्यानुसार महाआघाडी झाली असून कन्हैय्या कुमारही आता लोकसभेत आपलं सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवेल यात काही शंका नाही.

VIDEO : धावत्या लोकलच्या दारात तरुणीची स्टंटबाजी

First published: September 2, 2018, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading