VIDEO : तापाने 125 मुलांचा मृत्यू अन् आरोग्यमंत्री विचारतात स्कोअर किती?

VIDEO : तापाने 125 मुलांचा मृत्यू अन् आरोग्यमंत्री विचारतात स्कोअर किती?

परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वागायचं असतं याचं गांभीर्य या आरोग्यमंत्र्यांनी ठेवलं नाही त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येतेय.

  • Share this:

पाटणा, 17 जून : बिहारमध्ये चमकी तापानं थैमान घातलंय. या तापामुळे मुझफ्फुर जिल्ह्यात 125 मुलांचा बळी गेला. या तापाचा जोर अजुनही कायम आहे. परिस्थिती आटोक्यात येत नसल्यानं गंभीर चिंता व्यक्त होतेय. मात्र याचं गांभीर्य बिहारच्या आरोग्य मंत्र्यांना दिसत नाही. रविवारी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी क्रिकेट मॅचचा लेटेस्ट स्कोअर काय आहे असा प्रश्न विचारलाय. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर जळजळीत टीका करण्यात येतेय.

या आढावा बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हेही उपस्थित होते. रविवारीच भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच होती. त्यामुळे सगळ्यांनाच त्या मॅचबद्दल उत्सुकता होती. मात्र असं असतानाही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वागायचं असतं याचं गांभीर्य या आरोग्यमंत्र्यांनी ठेवलं नाही त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येतेय.

बिहारच्या मुझप्फरपूर जिल्ह्यात 'चमकी' या तापाने थैमान घातलंय. या तापाने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची संख्या 125 वर गेली आहे. अजुनही हा ताप आटोक्यात आला नसून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय. अॅक्युट इंसेफलाइटिस सिंड्रोम (AES) असं या तापाला म्हटलं जातं. लहान मुलांना या तापाची लागण होते आणि त्यांची तब्ब्येत झापाट्याने खालावते आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेलंय. सरकार या तापाला आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय.

गेल्या काही दिवसांपासून या तापाने डोकं वर काढल्याने मुझफ्परपूरची चर्चा सर्व देशभर होतेय. जिल्ह्यातल्या सर्व सरकारी दवाखाने भरले असून उपचारासाठी डॉक्टरांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आलीय. सर्वच दवाखाण्यामध्ये दररोज आजारी मुलांचं येणं सुरूच आहे. लिचीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात दरवरर्षी शेकडो मुलं या प्रकारच्या आजाराने बळी पडतात मात्र त्यावर अजुन उपाय सरकारला शोधता आला नाही.

कुपोषीत मुलांनी लिची खाल्ल्यामुळे हा आजार होते अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. कुपोषीत मुलांनी उपोषीपोटी लीची खाल्लीतर त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण झापाट्याने खाली जातं आणि ते आजारी पडतात असं म्हटलं जातं. मात्र डॉक्टरांनी याचं नेमकं कारण काय आहे हे अजुन स्पष्ट केलेलं नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज मुझफ्फरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

First published: June 17, 2019, 6:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading