'पैसे दे नाहीतर...', पत्र लिहून डॉक्टरांच्या क्लिनिकवर अंधाधूंद गोळीबार; CCTVमध्ये कैद झाला थरार

एकीकडे डॉक्टरांना योद्धा म्हणत संपूर्ण देशात त्यांना सलाम केले जात असताना बिहारमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे.

एकीकडे डॉक्टरांना योद्धा म्हणत संपूर्ण देशात त्यांना सलाम केले जात असताना बिहारमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे.

  • Share this:
    गोपाळगंज, 10 ऑगस्ट : बिहारच्या गोपाळगंजमध्ये (Gopalganj) खंडणीच्या मागणीवरून गुन्हेगारांनी चक्क डॉक्टरांच्या क्लिनिकवर गोळीबार केला.गोळीबाराच्या वेळी गुन्हेगारांनी खंडणीची मागणी करणारी एक चिठ्ठी सोडली आणि तेथून फरार झाले. या चिठ्ठीत खंडणीसाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे. घटना उचकागांव पोलीस स्टेशन परिसरातील बदरजीमी मार्केट जवळ घडली. एकीकडे डॉक्टरांना योद्धा म्हणत संपूर्ण देशात त्यांना सलाम केले जात असताना बिहारमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आहे. ही घटना घडल्यानंतर बिहारमधील डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दाही पुन्हा नव्याने उपस्थित झाला आहे. डॉ.एके शर्मा असे पीडित डॉक्टरचे नाव आहे. उचकागांव पोलीस स्टेशन परिसरातील बदरजीमी मार्केटजवळ येथे या डॉक्टरांचे क्लिनिक आहे. येथून रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून दोन गुन्हेगार आले. गुन्हेगारांनी सुरुवातीला डॉक्टरांच्या निवासस्थानी गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार सुरू असताना गुन्हेगारांनी लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी करणारे एक पत्रही फेकले. यात पैशांबरोबरच जिवे मारण्याची धमकीही दिली. वाचा-एक अपघात अन् अख्ख्या समुद्राचं पाणी झालं काळं! 'या' देशानं जाहीर केली आणीबाणी वाचा-दोघेही होते कट्टर मित्र, पण M नावाच्या टॅटूमुळे झाला वाद अन्... CCTVमध्ये कैद झाला थरार गोळीबार झाल्याची संपूर्ण घटना डॉक्टरच्या घरात जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर पीडित डॉक्टरचे कुटुंब घाबरले आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वी काही गुन्हेगारांनी एका किराणा व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केली होती. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published: