नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासामध्ये नोकरी मिळावी यासाठी कित्येकजण अभ्यास करतात. कठोर मेहनत घेतल्यानंतर जेव्हा नासामध्ये नोकरी मिळते तेव्हा कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं पण त्याच नासाने तीन वेळा नोकरीची ऑफर दिल्यानंतरही ती भारताच्या 19 वर्षीय तरुणाने धुडकावून लावली. इतकंच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेलं आमंत्रणही नाकारलं. हे करत असताना त्याने सांगितलं की, माझ्या देशाची सेवा करत राहणं हेच माझं ध्येय आहे.
बिहारच्या भागलपूर इथल्या ध्रुवगंज गावात राहणाऱ्या गोपालने दरवर्षी देशातील 100 मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये त्याने आपल्या कामाची सुरुवात केली आहे. त्याने 8 मुलांच्या शोधाचे प्रोव्हिजनल पेटेंट करून दिले आहे. सध्या गोपाल डेहराडून सरकारी ग्राफिक एरा इन्स्टिट्यूटच्या लॅबमध्ये चाचणी घेत आहे. तो झारखंडमध्ये लॅब उभारून संशोधन करणार आहे.
गोपालने 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतलं असून 2013-14 मध्ये बनाना बायो सेलच्या संशोधनासाठी त्याला इन्स्पायर्ड अॅवॉर्ड मिळाला. त्याला दहावीनंतर शिकता येणार नाही असंही त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं. त्यावेळी स्कॉलरशिप मिळावी असं काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात आला. तेव्हा 2017 मध्ये गोपालने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्याला एनआयएफ, अहमदाबाद इथं पाठवण्यात आलं. या ठिकाणी त्याने 6 शोध लावले.
अबुधाबीत 6 हजार वैज्ञानिकांना करणार मार्गदर्शन
आता गोपालचं नाव जगभरातील 30 स्टार्ट अप वैज्ञानिकांमध्ये घेतलं जातं. एप्रिलमध्ये अबुधाबीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स फेअरमध्ये 6 हजार वैज्ञानिक सहभागी होतील. त्यामध्ये गोपाल प्रमुख वक्ता असणार आहे. सध्या त्याच्या नावावर दोन पेटंट असून काही प्रयोग सुरू आहेत. त्याने गेल्या दोन वर्षांत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. यामध्ये भारत सरकारकडून देण्यात आलेल्या पुरस्कारांचाही समावेश आहे.
काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.