मराठी बातम्या /बातम्या /देश /IITच्या स्वप्नांची नवी भरारी... देशामधील या गावाची ओळख आहे 'आयआयटीयन्सचं गाव'!

IITच्या स्वप्नांची नवी भरारी... देशामधील या गावाची ओळख आहे 'आयआयटीयन्सचं गाव'!

बिहारमधल्या गया येथील मानपूर पटवा टोली या गावाला Village of IITians म्हणून ओळखलं जातं. 2013 मध्ये मानपूर पटवा टोली येथे 'वृक्ष विथ द चेंज' सुरू करण्यात आलं. दरवर्षी डझनभराहून अधिक विद्यार्थी येथून आयआयटी आणि जेईई परीक्षा देतात.

बिहारमधल्या गया येथील मानपूर पटवा टोली या गावाला Village of IITians म्हणून ओळखलं जातं. 2013 मध्ये मानपूर पटवा टोली येथे 'वृक्ष विथ द चेंज' सुरू करण्यात आलं. दरवर्षी डझनभराहून अधिक विद्यार्थी येथून आयआयटी आणि जेईई परीक्षा देतात.

बिहारमधल्या गया येथील मानपूर पटवा टोली या गावाला Village of IITians म्हणून ओळखलं जातं. 2013 मध्ये मानपूर पटवा टोली येथे 'वृक्ष विथ द चेंज' सुरू करण्यात आलं. दरवर्षी डझनभराहून अधिक विद्यार्थी येथून आयआयटी आणि जेईई परीक्षा देतात.

नवी दिल्ली, 23 एप्रिल : देशभरात आयआयटीची (IIT) महाविद्यालयं आणि उच्च महाविद्यालयांमध्ये केवळ अत्यंत मोजक्या हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. यासाठी प्रचंड अभ्यास आणि मेहनत करावी लागते. लाखो विद्यार्थ्यांचं आयआयटीमध्ये शिकण्याचं स्वप्न (dream) असतं. कारण इथे शिकून बाहेर पडल्यानंतरच नाही तर, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा मान-सन्मान मिळतो. त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. मात्र, हुशारी आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनाही इथे प्रवेश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

आयआयटीमध्ये शिकल्यानंतर गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि परदेशवाऱ्यांची संधी मिळत असल्यामुळे भरमसाट शुल्क आकारणाऱ्या कोचिंग क्लासेसचाही सुळसुळाट झाला आहे. जाहिरातबाजी करून आणि खोटी स्वप्न दाखवून शिक्षणाच्या बाजारात मोठी लुटालूट सुरू आहे. इथं हुशार, होतकरू आणि मेहनती पण आर्थिक स्थिती गरिबीची असलेल्या विद्यार्थ्यांना कोणी विचारतही नाही. याच्यावरती भाष्य करणारा 'सुपर 30' (Super 30) हा सिनेमाही येऊन गेलाय. अशात बिहारमधल्या एका गावानं 'आयआयटीयन्सचं गाव' (Village of IITians) नाव कमावलंय.

चला, जाणून घेऊया कोणतं आहे हे गाव आणि त्याला ही ओळख कशी मिळाली..

बिहारमधल्या गया येथील मानपूर पटवा टोली या गावाला Village of IITians म्हणून ओळखलं जातं. 2013 मध्ये मानपूर पटवा टोली येथे 'वृक्ष विथ द चेंज' सुरू करण्यात आलं. दरवर्षी डझनभराहून अधिक विद्यार्थी येथून आयआयटी आणि जेईई परीक्षा देतात. यशस्वी झाल्यानंतर ते देश-विदेशात नोकरीसाठी जातात. पटवा टोलीला आयआयटीयन्सचं गाव बनवण्याची तयारी इथल्या लोकांनी केली सुरू आहे.

बिहारमधील गया येथील मानपूर पटवा टोली येथे आयआयटीयनची रोपटी तयार केली जात आहे. दरवर्षी डझनभराहून अधिक विद्यार्थी येथून आयआयटी आणि जेईई परीक्षा उत्तीर्ण करतात, असं सांगितलं जातं. यशस्वी झाल्यानंतर ते देश-विदेशात नोकरीसाठी जातात. प्रसिद्ध पटवा टोली हे आयआयटीयन्सचं गाव बनवण्याची तयारी सुरू आहे. इथे विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी संपूर्ण शिक्षण मोफत दिलं जातं. त्यामुळे सध्या या संस्थेला 'वृक्ष संस्था' असं नाव देण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत गरीबांपासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत आयआयटीयन होण्याचं स्वप्न साकार होत आहे. इथे ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीहून येथे ऑनलाइन वर्गही घेतले जातात.

हे वाचा - मोठी बातमी! आठवड्याला 12 तास काम, जास्त PF; 1 जुलैपासून होणार 'हे' बदल?

विद्यार्थी दरवर्षी यशस्वी होतात

मोफत शिक्षण देणाऱ्या वृक्ष संस्थेत दरवर्षी डझनहून अधिक विद्यार्थी आयआयटी आणि जेईई परीक्षेत यश मिळवतात. या यशामागे 'ट्री विथ द चेंज' या मोफत शिक्षण संस्थेचं मोठं योगदान आहे. इथे पॉवरलूम्सचा कर्कश आवाज आणि अरुंद गल्ल्यांमध्ये असलेल्या काही खोल्यांमध्ये आयआयटीयन्स तयार होत आहेत. ही संस्था 2013 पासून यशस्वी IITians कडून दिल्या जाणाऱ्या परस्पर आर्थिक सहाय्याने चालवली जाते. इथे सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. देशातील नामवंत शिक्षकांकडून मुलांना ऑनलाइन शिक्षण दिलं जातं. अभियांत्रिकी उत्तीर्ण होऊन देशातील विविध ठिकाणी कार्यरत असलेले पटवा टोली इथे तयार झालेले लोक या संस्थेला मुक्तहस्ते मदत करतात. जेणेकरून त्यांच्या भावी पिढ्याही त्यांच्यासारख्या बनू शकतील.

हे वाचा - 36 तास चकमक, 3 दहशतवादी ठार; मोदींचा दौरा होता टार्ग्रेटवर?

वृक्ष संस्थेचे संस्थापक चंद्रकांत पाटेकर यांनी सांगितलं की, 2013 साली याची सुरुवात झाली होती. त्याची प्रेरणा आम्हाला आमच्या गरीब मित्रांकडून मिळाली. कारण त्यांना गरिबीत शिक्षण घेता आलं नाही. गरिबीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याने शिक्षण सोडू नये, हाच आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी संपूर्ण शिक्षण मोफत दिलं जातं. त्यामुळे सध्या या संस्थेला वृक्ष संस्थेचं नाव देण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत गरीबांपासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत आयआयटीयन होण्याचे स्वप्न साकार होत आहे.

First published:

Tags: Bihar, Education, IIT