Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये मंदिराबाहेर पार पडला अनोखा विवाह, हिंदू मुलानं बांधली मुस्लीम मुलीशी लग्नगाठ

लॉकडाऊनमध्ये मंदिराबाहेर पार पडला अनोखा विवाह, हिंदू मुलानं बांधली मुस्लीम मुलीशी लग्नगाठ

नसरीन परवीन आणि अनंत कुमार या दौघांनी धर्माची बंधन झुगारून विवाह केला आहे. लॉकडाऊनमुळे मंदिरं बंद असल्याने या प्रेमीयुगुलाने मंदिराबाहेरच लग्न केलं.

    गया, 23 एप्रिल :  प्रेमाचा विषय असेल तर अनेक ठिकाणी धर्म, जात, रुढी, परंपरा या गोष्टी मागे पडलेल्या दिसून येतात. असाच काहीसा प्रकार बिहारमधील गया शहरामध्ये घडला आहे. याठिकाणच्या बहुआर चौरा मोहल्ल्यातील नसरीन परवीन आणि अनंत कुमार या दौघांनी धर्माची बंधन झुगारून विवाह केला आहे. लॉकडाऊनमुळे मंदिरं बंद असल्याने या प्रेमीयुगुलाने मंदिराबाहेरच लग्न केलं. खूप प्रयत्न करून त्याठिकाणी भटजींना बोलावण्यात आले आणि हा छोटेखानी लग्नसोहळा पार पडला. (हे वाचा-खळबळजनक! बहीण-भावाचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत, आत्महत्येपूर्वी केलं लग्न?) (हे वाचा-हे लोक उपाशी का आहेत? लेकीच्या निष्पाप प्रश्नाने हेलावला शेतकरी; अशी केली मदत एकाच मोहल्ल्यात राहणाऱ्या नसरीन आणि अनंत या दोघांचे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून दोघांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या. तसंच नसरीनच्या कुटुंबीयांना त्या दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहित झालं होतं. परिणामी तिला मारझोड करण्यात आली असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे. तिला एका खोलीत देखील बंद करून ठेवण्यात आलं होतं. या सगळ्यापासून लपतछपत नसरीनने अनंतला गाठलं आणि त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनंतने दिलेल्या माहितीनुसार त्याचे कुटुंबीय या लग्नानंतर खूश आहेत. मात्र मुलीचे पालक त्यांच्या नात्याच्या विरोधात होते आणि त्यामुळेच त्यांनी तिला मारहाण देखील केली होती. एवढच नव्हे तर तिच्या घरच्यांनी तिला गोळी मारण्याची धमकी दिल्याची माहितीही अनंतने दिली आहे. त्यामुळे अगदी फिल्मी स्टाइलने गच्चीवरून उडी मारून नसरीन अनंतपर्यंत येऊन पोहोचली आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या