मराठी बातम्या /बातम्या /देश /

BIHAR EXIT POLL : त्रिशंकू अवस्थेचा अंदाज; पण बिहारी जनतेनेच ठरवले होते 100 टक्के चूक एक्झिट पोल

BIHAR EXIT POLL : त्रिशंकू अवस्थेचा अंदाज; पण बिहारी जनतेनेच ठरवले होते 100 टक्के चूक एक्झिट पोल

बिहारी जनतेने गेल्या वेळी EXIT POLL चे अंदाज साफ चुकवले होते. कोण मुख्यमंत्री होणार वगैरे मतं तयार करण्याआधी जरा गेल्या वेळच्या निवडणुकीत काय झालं होतं ते पाहा...

बिहारी जनतेने गेल्या वेळी EXIT POLL चे अंदाज साफ चुकवले होते. कोण मुख्यमंत्री होणार वगैरे मतं तयार करण्याआधी जरा गेल्या वेळच्या निवडणुकीत काय झालं होतं ते पाहा...

बिहारी जनतेने गेल्या वेळी EXIT POLL चे अंदाज साफ चुकवले होते. कोण मुख्यमंत्री होणार वगैरे मतं तयार करण्याआधी जरा गेल्या वेळच्या निवडणुकीत काय झालं होतं ते पाहा...

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
पाटणा, 7 नोव्हेंबर : बिहार विधासनभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीचे (EXIT POLL) निकाल आता जाहीर होत आहेत. बहुतेक सर्व संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या महागठबंधनला भाजप- JDU प्रणिक NDA पेक्षा  जास्त जागा मिळाल्याचं दिसत आहे. पण कुठल्याही एका आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असंच एक्झिट पोल्स सांगतात. पण एक्झिट पोलचे अंदाज पाहून कोण मुख्यमंत्री होणार वगैरे मतं तयार करण्याआधी जरा गेल्या वेळच्या निवडणुकीत काय झालं होतं ते पाहा... बिहारमध्ये 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप प्रणित NDA ला जवळपास बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बहुतेक सर्व संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीत NDA ला 110 च्या वर जागा मिळतील, असं सांगण्यात येत होतं.  प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा बिहार विधानसभेचं चित्र बरोबर उलट होतं. राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, काँग्रेस यांच्या महागठबंधनला बहुमत मिळालं आणि NDA ला जेमतेम 55 जागाच मिळाल्या. 2015 चं चित्र RJD – 80 काँग्रेस – 27 JDU – 71 भाजप – 53 LJP – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 राष्ट्रीय जनता दल ठरणार मोठा पक्ष बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी लढत आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव (Tejaswai yadav) याचा मतदानोत्तर चाचणीत कल तपासण्यात आला. आता 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी बिहारचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ABP आणि C VOTER चा अंदाज एकूण जागा – 243 भाजप – 66-74 JDU – 38-46 RJD – 81-89 काँग्रेस – 21-29 LJP – 2 LEFT 6-13 रालोसप – 1-3 अन्य 4-8 TIMES NOW चा अंदाज NDA 116 UPA 120 Others 07 रिपब्लिक जन की बात चा अंदाज एकूण जागा – 243 NDA 91-117 MGB/UPA 118-138 LJP 5-8 OTH 3- 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत  71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी ही सरळ लढत ठरली नाही ती लोकजनशक्ती पक्षामुळे. LJP चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात प्रचार केला, पण आपला भाजपला विरोध नसल्याचं स्पष्ट केलं. निकालानंतर भाजपबरोबर आघाडी करायची पासवान यांची तयारी आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2020) RJD ने 144 जागा लढवल्या तर काँग्रेसने 70 आणि CPI(ML) ने 19 जागा लढवल्या. NDA कडून नितीश कुमारांच्या JD (U) 115 जागा लढवल्या तर भाजपचे उमेदवार 110 जागांवर उभे होते. गेल्या वेळच्या बिहार विधानसभा निवडणुकीने सगळ्यांचे अंदाज चुकवले होते. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचा अनुभव त्या वेळी होता. मागच्या बिहार विधानसभेला भाजप आणि नितीश कुमार एकमेकांच्या विरोधात होते. NDA मध्ये नितीश कुमार नव्हते. त्याऐवजी ते काँग्रेस, राजदबरोबर महागठबंधनमध्ये होते.
First published:

Tags: Bihar Election, Nitish kumar

पुढील बातम्या