Home /News /national /

Bihar Election Results: VVIP चेहरे पडले मागे, लंडन रिटर्न पुष्‍पम प्रिया यांना करावी लागेल वापसी?

Bihar Election Results: VVIP चेहरे पडले मागे, लंडन रिटर्न पुष्‍पम प्रिया यांना करावी लागेल वापसी?

मतमोजणीत अनेक बाहुबली नेते आणि व्हीआयपी चेहरे मागे पडलेले दिसत आहेत.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar election Results 2020) मतमोजणी सुरू आहे. पहिल्या, दुसऱ्या कलमध्ये उतार-चढावानंतर हाती आलेल्या कलानुसार मोठं परिवर्तन झाल्याचं दिसत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत बिहारमध्ये सर्व ट्रेंड बदलले आहेत. एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएनं 127 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सुरूवातीपासून पुढे चालणाऱ्या महागठबंधन आता पिछाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महागठबंधन 100 जागांवर वाटचाल करत आहे. हेही वाचा...Bihar Election: बिहारमध्ये भाजप झाला मोठा भाऊ, मुख्यमंत्री होणार का नितीशकुमार? दुसरीकडे, मतमोजणीत अनेक बाहुबली नेते आणि व्हीआयपी चेहरे मागे पडलेले दिसत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार हसनपूर मतदार संघात लालूप्रसाद यादव याचे पुत्र तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत. तर स्वत: ला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार सांगणाऱ्या 'द प्लूरल्स पार्टी' (Plurals Party) च्या प्रमुख पुष्पम प्रिया चौधरी (Pushpam Priya Choudhary) या दोन्ही जागांवर मागे आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा लंडन वापसी करावी लागते की काय, अशी जोरदार चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. पाटणामधील बांकीपूर आणि मधुबनीच्या बिस्फी मतदार संघातून पुष्पम प्रिया निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पुष्पम प्रिया या निवडणुकीत सुरूवातीपासून चर्चेत होत्या. पुष्पम प्रिया यांनी बिहारमधील स्ठानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार सांगितलं होत. पुष्पम या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रचार केला होता. मात्र, दोन्ही मतदार संघात पुष्पम यांची पिछेहाट होताना दिसत आहे. हाय प्रोफाइल सीट बांकीपूरमध्ये अत्यंत वाईट अवस्था.. बांकीपूर ही विधानसभेची जागा 'हाय प्रोफाइल सीट' मानली जाते. त्यामुळे या मतदार संघातून बॉलीवूड अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजिव लव्ह सिन्हा मैदानात उतरले आहेत. तर भाजपकडून तीनदी आमदार राहिलेले नितिन नबीन आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या कलनुसार नितिन नवीन हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. तर पुष्पम यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मधुबनीमधील बिस्फीमध्येही पिछाडीवरच.. मधुबनी जिल्ह्यातील बिस्फीमधूनही पुष्पम प्रिया मैदानात उतरल्या आहेत. मात्र, येथेही त्या पिछाडीवरच आहेत. भाजपचे हरिभूषण ठाकूर हे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे डॉ. फैयाज अहमद हे दुसऱ्या क्रमाकावर आहेत. हेही वाचा..CM पदाचे दावेदार तेजस्वी 9वी,तेज प्रताप 12वी पास; लालूंच्या 7 कन्या उच्चशिक्षित लंडन रिटर्न आहेत पुष्पम प्रिया चौधरी पुष्पम प्रिया या जेडीयू नेता विनोद चौधरी यांच्या कन्या आहेत. ते मूळच्या दरभंगा येथी आहेत. पुष्पम यांनी लंडन येथील प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्समधून पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. ~~~
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election

    पुढील बातम्या