Home /News /national /

bihar election results 2020: बिहारमध्ये भाजपनं खेळली 'ही' चाल, या मतदार संघात झाला फायदाच फायदा!

bihar election results 2020: बिहारमध्ये भाजपनं खेळली 'ही' चाल, या मतदार संघात झाला फायदाच फायदा!

    संदीप कुमार, (प्रतिनिधी) पाटणा, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections 2020) भाजपनं खेळलेली 'चाल' आता यशस्वी होताना दिसत आहे. भाजपला (BJP) स्‍टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ (Yogi Adityanath) यांचा चांगलाच फायदा झाल्याचं समोर येत असलेल्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी बिहारमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाच्या जोडीस तोड प्रचार केला. त्याचा भाजपला प्रत्येक मतदार संघात फायदाच फायदा झाला. योगी आदित्‍यनाथ यांनी बिहारमध्ये जिथे-जिथे प्रचार सभा घेतल्या तिथे भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, बिहारमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. तर भाजपचा मित्र पक्ष जदयूचीही (JDU) यशस्वी घोडदौड सुरू आहे. हेही वाचा..बिहार निवडणुकीचे दोन्ही चेहरे निष्प्रभ? सर्वाधिक स्ट्राइक रेट डावे आणि भाजपचा! बिहारमध्ये योगींचा झंझावात.. योगी आदित्‍यनाथ यांनी 6 दिवसांत 18 जाहीर सभा घेतल्या. याचा अर्थ असा की, योगी आदित्यनाथ यांनी एका दिवसांत सरासरी 3 सभांना संबोधित केलं. बिहारमध्ये गेल्या (2015) निवडणुकीत महागठबंधनकडून जिथे नुकसान झालं होतं, त्या-त्या मतदार संघावर या निवडणुकीत भाजपनं फोकस केलं होतं. योगी आदित्‍यनाथ यांनी देखील त्याच मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून प्रचाराचा झंझावात केला. त्याचा फायदा आता पक्षाला होताना दिसत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात प्रचार करताना मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ हे 6 महत्त्वाच्या मतदार संघात प्रचारासाठी पोहोचले होते. जमुई, काराकाट, पालीगंज, तरारी, अरवल या जागांचा त्यात समावेश होता. गेल्या निवडणुकीत या मतदार संघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणूक आयोगाकडून 3 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीत जमुईत भाजपच्या उमेदवार श्रेयसी सिंह या आघाडीवर आहेत. अरवलमध्ये भाजपचे उमेदवार दीपक कुमार शर्मा आणि सीपीआय एमएमएलचे (CPIMLL) महानंद सिंह यांच्या तगडी लढत सुरू आहे. काराकाटमध्ये भाजपचे राजेश्‍वर राज आणि सीपीआय एमएमएलचे अरुण सिंह यांच्या काट्याची टक्‍कर सुरू आहे. तर रामगडमध्ये भाजपचे अशोक कुमार सिंह आणि बीएसपीच्या (BSP) अंबिका सिंह यांच्या अटीतटीचा सामना सुरू आहे. या शिवाय पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरेयाकोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर आणि दरभंगामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा प्रभाव निकालावर दिसत आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार.. पूर्णिया- भाजपचे विजय कुमार खेमका विजयाच्या उंबरठ्यावर सहरसा- भाजपचे आलोक रंजन यांचा विजय निश्चित सिवान- भाजपचे ओम प्रकाश यादव विजयच्या जवळ गोरेयाकोठी-भाजपचे देवेश कांत सिंह यांची विजयाकडे वाटचाल भागलपूर- भाजपचे रोहित पांडे यांची यशस्वी घोडदौड गोविंदगंज- भाजपचे सुनील मणि तिवारी यांचा विजय निश्चत झंझारपूर- भाजपचे नितिन मिश्रा विजयाच्या उंबरठ्यावर दरभंगा- भाजपचे संजय सराओगी यांचा विजय निश्चित 18 पैकी 9 ते 10 मतदार संघात योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा भाजपला फायदा मिळाला आहे. काय ठरला विजय फॅक्टर? बिहारमध्ये बहुताश ठिकाणी गोरक्षपीठाचा चांगला प्रभाव पडला. अशाच ठिकाणी भाजपनं योगी आदित्यनाथ यांचा चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतला. विशेष म्हणजे, पूर्व बिहार, उत्तर बिहार आणि मिथिलांचलमध्ये गोरक्षपीठाचा भाजपला लाभ मिळाला आहे. हेही वाचा..बिहारमध्ये VVIP चेहरे पडले मागे, लंडन रिटर्न पुष्‍पम प्रिया यांना करावी लागेल वापसी दरम्यान, कोरोना लॉकडाऊनच्या काळात स्थानिक मजुरांचा 'घरवापसी' वापसीचा मोठा मुद्दा समोर होता. यातच योगी आदित्‍यनाथ यांनी बिहार मजुरांचं कौतुक केलं. त्यांची प्रशंसा केली होत. उत्तर प्रदेशात कामासाठी आलेल्या बिहारमधील मजुरांना बॉर्डरपर्यंत पोहोचवण्याच काम योगी आदित्‍यनाथ सरकारनं केलं होतं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या