अटीतटीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत अखेर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने बाजी मारली आहे. एनडीएने बहुमताचा 122 हा जादुई आकडा पार केला आहे. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहार निवडणूक निकालाबाबत भाष्य केलं आहे.
'बिहारच्या प्रत्येक मतदाराने हे स्पष्ट केलं आहे की ते महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांचं प्राधान्य फक्त आणि फक्त विकास हेच आहे. बिहारमध्ये 15 वर्षांनंतरही पुन्हा NDAच्या सुशासनाला आशीर्वाद मिळणं हेच दाखवतं की बिहारचे स्वप्न आणि अपेक्षा काय आहेत...,' असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी निकालानंतर समाधान व्यक्त केलं आहे.