Home /News /national /

Bihar Election 2020 जिन्नांच्या फोटोचं समर्थन करणारे मशकूर उस्मानी पिछाडीवर; भाजप उमेदवार देणार झटका?

Bihar Election 2020 जिन्नांच्या फोटोचं समर्थन करणारे मशकूर उस्मानी पिछाडीवर; भाजप उमेदवार देणार झटका?

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar election result live) मशकूर अहमद उस्मानी (Mashkoor Ahmed Usmani) हे उमेदवार काँग्रेसने तिकीट दिल्याबरोबर चर्चेचा विषय झाले होते.

  पाटणा, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar election result live) मशकूर अहमद उस्मानी (Mashkoor Ahmed Usmani) हे उमेदवार काँग्रेसने तिकीट दिल्याबरोबर चर्चेचा विषय झाले होते. एके काळी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिन्ना (Jinnah )यांची प्रतिमा हटवण्याला विरोध करणारे आणि जिन्नांचं समर्थन करणारे विद्यार्थी नेते म्हणून चर्चेत असलेलं हे नाव काँग्रेसने उचलून धरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. बिहारच्या जाले (Jale seat) मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत आणि पहिल्या आकड्यांनुसार भाजप उमेदवाराने त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. मशकूर अहमद उस्मानी हे अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या  (Aligarh Muslim University) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. ते उत्तर प्रदेशातल्या या विद्यापीठात कार्यरत असताना 2018 मध्ये भाजप खासदार सतीश गौतम यांनी युनिव्हर्सिटीत लावलेलं मोहम्मद अली जिना यांचं चित्र हटवण्याची मागणी केली. त्यावर विद्यार्थी नेता म्हणून उस्मानी यांनी आक्षेप घेतला होता. जिनांचं आणि त्यांच्या चित्राचं समर्थन केलं होतं. आता बिहारच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने युवा नेता म्हणून उस्मानी यांना तिकीट दिल्याने 'जिन्नांचं समर्थक करणाऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस' असा प्रचार करण्यात आला होता.  त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत पाकिस्तानचे जनक जिन्ना यांचं नावही चर्चेत आलं होतं. मशकूर उस्मानी हे पहिल्यांदाच जाले मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पक्षीय राजकारणातली त्यांची ही पहिलीच खेळी आणि पहिलीच निवडणूक आहे. निवडणूक निकालाच्या ताज्या अपडेट्सनुसार मशकूर उस्मानी जवळपास 5000 मतांनी पिछाडीवर होते. ताजे अपडेट्स live पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

  Bihar election Result LIVE: बिहारमध्ये बदलला गेम! NDA ला बहुमत.. 125 जागांवर आघाडी

  मागच्या निवडणुकीत जाले मतदारसंघ भाजपने जिंकला होता. तिथले भाजप आमदार जिबेश कुमार हेच आताही उस्मानींच्या विरोधात रिंगणात आहेत. पहिल्या फेऱ्यांतल्या आकडेवारीनुसार तरी भाजपने मशकूर उस्मानींना झटका दिल्याचं दिसतं. बिहार निवडणूक आणि अन्य पोटनिवडणुकांचे ताजे अपडेट्स इथे पाहा.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Bihar Election, Congress

  पुढील बातम्या