Home /News /national /

Bihar Election: शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा ते शरद यादव यांची मुलगी, या 'हाय व्होल्टेज' लढतींमध्ये कोण ठरणार वरचढ

Bihar Election: शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा ते शरद यादव यांची मुलगी, या 'हाय व्होल्टेज' लढतींमध्ये कोण ठरणार वरचढ

Bihar Election Result 2020: आज हा देखील निर्णय होणार आहे की, नीतिश कुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा बिहारची सत्ता काबीज करणार की तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील.

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Assembly Election Results) निकाल आज लागत आहे. काही जागांचा कल समोर येत आहे, ज्यानुसार सुरुवातीला महागठबंधन आघाडीवर होते मात्र आता एनडीएने आघाडी घेतला आहे. आज हा देखील निर्णय होणार आहे की, नीतिश कुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा बिहारची सत्ता काबीज करणार की तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्याचप्रमाणे असे अनेक चेहरे आहे ज्यांच्यावर देशाच्या नजरा खिळल्या आहेत. यावेळी असे अनेक उमेदवार आहेत जे पहिल्यांदा रिंगणात उतरले आहेत. हे उमेदवार जरी नवीन असले तरी त्यांच्या मागे काही मोठ्या नेत्यांचा चेहरा आहे. यावेळीच्या निवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव उतरला आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की लव्ह लोकप्रियता मिळवू शकेल की नाही. त्याचबरोबर या निवडणुकीत पुष्पम प्रिया नवीन चेहरा आहे. तेजस्वी यादव दुसर्‍या वेळी राघोपूरमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तेजस्वी हे महागठबंधनच्या वतीने मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, अशा परिस्थितीत राघोपूरचा त्यांचा विजय किती मोठा आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (हे वाचा-तेजस्वी यादव यांची मोदींना 'काँटे की टक्कर', भाजपपेक्षा जास्त जागांवर आघाडी) तेजस्वी यादव: तेजस्वी यादव राघोपूरमधून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आधीच्या निवडणुकीत भाजपच्या सतीश कुमार यांना 22 हजार मतांनी तेजस्वी यादव यांनी हरवले होते. यावेळीही त्यांची लढाई सतीश कुमार यांच्याबरोबर आहे. तेजस्वी यादव यांच्या मताधिक्याचा आकडा वाढेल की सतीश कुमार बाजी मारतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल तेज प्रताप यादव: त्यानंतर तेज प्रताप यांनी यावेळी मतदारसंघ बदलला आहे. 2015च्या निवडणुकीत तेज प्रताप यादव महुआ सीटवरुन आमदार झाले होते, पण यावेळी ते हसनपूरमधून लढत आहेत. हसनपूरमध्ये त्यांचा सामना जेडीयूच्या राजकुमार राय यांच्याशी आहे. 2015 मध्ये राजकुमार राय यांनी आरएलएसपीचे विनोद चौधरी यांचा 29 हजार मतांनी पराभव केला होता. (हे वाचा-मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारला मोठा दिलासा, ज्योतिरादित्य शिंदेंनी करून दाखवले) पुष्पम प्रिया चौधरी: पुष्पम प्रिया या निवडणुकीत बिस्फी आणि बांकीपूर या दोन विधानसभा जागांवरुन लढत आहेत. वर्तमानपत्रामध्ये स्वत:ला बिहारची पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर पुष्पण प्रिया प्रकाशझोतात आल्या होत्या. पुष्पम प्रिया यांचा बिस्फी मतदारसंघात आरजेडीच्या फैयाज अहमद यांच्या विरोधात मुकाबला आहे. लव सिन्हा: शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा देखील पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. बांकीपूरमधून ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. याठिकाणी त्यांचा मुकाबला भाजपचे नितीन नवीन आणि पुष्पम प्रिया यांच्याशी आहे. 2015 मध्ये बांकीपूरमध्ये नितीन नवीन यांनी कॉंग्रेसच्या कुमार आशिष यांचा 39,767 मतांनी पराभव केला होता. सुभाषिनी यादव: सुभाषिनी यादव शरद यादव यांच्या कन्या आहेत आणि बिहारीगंजमधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. सुभाषिनी यांचा सामना बिहारीगंज याठिकाणी जेडीयूचे निरंजन कुमार मेहता यांच्याशी आहे. 2015च्या निवडणुकीत निरंजन कुमार यांनी भाजपचे उमेदवार रवींद्र चरण यादव यांना 29,253 मतांनी पराभूत केले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election

    पुढील बातम्या