Home /News /national /

खाकी नंतर खादी! माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकारणात एंट्री, सत्ताधारी पक्षात प्रवेश

खाकी नंतर खादी! माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकारणात एंट्री, सत्ताधारी पक्षात प्रवेश

बिहार विधानसभा निवडणुकीचे (bihar election 2020) बिगुल वाजल्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला आहे.

    पाटणा, 27 सप्टेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचे (bihar election 2020) बिगुल वाजल्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (DGP Gupteshwar Pandey) राजकारणात पदार्पण केलं आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारमधील सत्ताधारी पक्ष अर्थात जनता दल (यु) मध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर ते बिहारमध्ये निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा...पुण्यात महिला डॉक्टरचा विनयभंग, जम्बो कोविड हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार बिहारमध्ये तीन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. कोरोनाच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. आता बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे राजकारणात एंट्री केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी गुप्तेश्वर पांडे यांना कालच फोन करून ऑफर दिली होती. त्यानुसार पांडे यांनी रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन जेडीयू मध्ये अधिकृत प्रवेश केला. गुप्तेश्वर पांडे यांनी अलीकडे बिहार पोलीस दलातून डीजीपी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हे वाल्मिकी नगरमधून लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गुप्तेश्वर पांडे यांना नितीशकुमार हे जनता दल युनायटेड या पक्षातून वाल्मिकीनगर जागेवरून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज हा तातडीने स्वीकारण्यात आला. दुसरीकडे, बिहार विधानसभा निवडणुकीत बक्सर येथील एका जागेवर उमेदवारी देण्याचीही चर्चा सुरू आहे. पण, जर वाल्मिकीनगरमधून उमेदवारी मिळाली तर गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे. गुप्तेश्वर पांडे हे नितीशकुमार यांच्या पक्षात सामील झाल्यामुळे आता ते विधानसभा निवडणूक लढणार की लोकसभा पोटनिवडणूक लढणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. गुप्तेश्वर पांडे यांचं नाव हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आले होते. या प्रकरणाच्या तपासावरून गुप्तेश्वर पांडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. एवढंच नाहीतर बिहारमधून मुंबईत चौकशीसाठी अधिकारीही पाठवण्यात आले होते. हेही वाचा...शिवसेनेनं काँग्रेसला फसवलं! फडणवीस-राऊत भेटीनंतर काँग्रेस नेत्याचा निशाणा दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे. यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत. याशिवाय लवकरच आयटीबिपी, सीआयएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी आणि बीएसएफच्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Saharsa.nitish kumar

    पुढील बातम्या