मराठी बातम्या /बातम्या /देश /गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एंट्री, सुशांत प्रकरणावरून ठाकरे सरकारवर केली होती टीका

गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात एंट्री, सुशांत प्रकरणावरून ठाकरे सरकारवर केली होती टीका


गुप्तेश्वर पांडे यांचं नाव हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आले होते.

गुप्तेश्वर पांडे यांचं नाव हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आले होते.

गुप्तेश्वर पांडे यांचं नाव हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आले होते.

पाटना, 26 सप्टेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीचे  (Bihar Assembly Election) शुक्रवारी बिगुल वाजले. त्यानंतर आता बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar Pandey) राजकारणात एंट्री करणार आहे.

गुप्तेश्वर पांडे हे लवकरच जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी गुप्तेश्वर पांडे यांना आपल्या पक्षाच्या कार्यालयात बोलावले आहे. याच वेळी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. आज दुपारीच त्यांचा पक्षात प्रवेश होणार आहे.

गुप्तेश्वर पांडे यांनी अलीकडे बिहार पोलीस दलातून डीजीपी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे हे राजकारणामध्ये सक्रीय होणार हे स्पष्ट झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हे वाल्मिकीनगरमधून लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच गुप्तेश्वर पांडे यांना नितीशकुमार हे जनता दल युनायटेड या पक्षातून वाल्मिकीनगर जागेवरून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज हा तातडीने स्वीकारण्यात आला. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत बक्सर येथील एका जागेवर उमेदवारी देण्याचीही चर्चा सुरू आहे. पण, जर वाल्मिकीनगरमधून उमेदवारी मिळाली तर गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही मोठी गोष्ट ठरणार आहे.

त्यामुळे लवकरच गुप्तेश्वर पांडे हे नितीशकुमार यांच्या पक्षात सामील होणार आहे. त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढणार की लोकसभा पोटनिवडणूक लढणार याचे चित्र स्पष्ट होईल.

गुप्तेश्वर पांडे यांचं नाव हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात समोर आले होते. या प्रकरणाच्या तपासावरून गुप्तेश्वर पांडे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. एवढंच नाहीतर बिहारमधून मुंबईत चौकशीसाठी अधिकारीही पाठवण्यात आले होते.

First published: