Home /News /national /

निवडणुकीची घोषणा होताच बिहारमध्ये राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात दिला चोप, पाहा VIDEO

निवडणुकीची घोषणा होताच बिहारमध्ये राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात दिला चोप, पाहा VIDEO

Bihar Assembly Election: बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निवडणुकीचे निकाल समोर येतील.

    पाटना 25 सप्टेंबर: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ही घोषणा होताच राज्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भाडणांना सुरूवात झाली आहे. भाजप आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये पाटण्यातल्या रस्त्यावरच राडा झाला. यादव यांचे पोस्टर्स असलेली प्रचाराची गाडी जात असतांना भाजप कार्यकर्ते आणि यादव यांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली बाचाबाचीचं रुपांतर भांडणात आणि नंतर हाणामारी असं दृश्य लोकांना बघायला मिळालं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यादव यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप दिला. निवडणुकांमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात कार्यकर्ते हे जास्त सक्रिय झाले आहेत त्यामुळे लहान सहान कारणांवरून हातघाईचे प्रसंग येत असतात. लोकांनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीपक्षांच्या कार्यकर्त्यांना शांत केलं. बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात निवडणूक होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी ही माहिती दिली. बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा 29 नोव्हेंबरला करण्यात येईल, अशी माहिती सुनील अरोरा यांनी दिली आहे. बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपत लोकशाहीचा अधिकार वापरण्याची संधी देण्यात आली आहे. नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल, असंही सुनील अरोरा म्हणाले. बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. एक तासानं मतदानाचा कालावधी वाढवला... बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मतदानाचा हक्क बजवावा. हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू लागू होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार आहे. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल. सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Bihar, Election, ‎ BJP

    पुढील बातम्या