Home /News /national /

Bihar Election Results: कोण जिंकणार बिहारची 'दंगल'? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

Bihar Election Results: कोण जिंकणार बिहारची 'दंगल'? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections) निकालाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे

    पाटना, 10 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Elections) निकालाची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे. परंतु, सर्वच  एक्झिट पोलमध्ये (Exit Polls)राजद नेता तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांच्या महागठबंधनला (Mahagathbandhan) कौल देण्यात आला आहे. त्यामुळे मतमोजणीत कोण बाजी मारतं हे पाहण्याचे ठरणार आहे. बिहारमध्ये 38 जिल्ह्यासाठी मतमोजणी ही 55 मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.  बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून आज 10 नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे.  त्याआधी 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान झालं. बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजप यांच्या आघाडीने जोरदार प्रचार केला. विरोधात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेस यांची आघाडी पूर्ण ताकदीने उतरली होती. दोन राष्ट्रीय पक्ष आणि दोन स्थानिक यांच्यातल्या लढ्याला तिसरी किनार मिळाली ती लोकजनशक्ती पार्टी या पासवान यांच्या पक्षामुळे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला गेल्या निवडणुकीत  71 जागा मिळाल्या होत्या. या वेळी जागा कमी होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) समोर आले आहे  बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला. तर दुसरीकडे, नितीशकुमार हे बिहार विधान परिषदेचे सदस्य आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही. राघोपूर मतदारसंघातून लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी निवडणूक लढवली होती. आता याच मतदारसंघातून तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातून हसनपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. या नेत्यांचा होणार फैसला आज मतमोजणीत अनेक राजकीय नेत्यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे. यामध्ये पटना साहिबमधून नंद किशोर यादव, मोतीहारीतून प्रमोद कुमार, मधुबनीतून राणा रणधीर, मुजफ्फरपुर येथून सुरेश शर्मा, नालंदातून श्रवण कुमार, दिनारामधून जय कुमार सिंह, जहानाबाद येथून कृष्णनंदन प्रसाद वर्मा यांचा समावेश आहे. तसंच माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, मकुश सहनी,  श्रेयसी सिंह, प्लूरल्स पार्टीच्या नेता पुष्पम प्रिया चौधरी यांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या