Home /News /national /

बिहारमध्ये भाजप झाला मोठा भाऊ, मुख्यमंत्री होणार का नितीशकुमार?

बिहारमध्ये भाजप झाला मोठा भाऊ, मुख्यमंत्री होणार का नितीशकुमार?

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ( Bihar Assembly Elections) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

    बिहार, 10 ऑक्टोबर : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ( Bihar Assembly Elections) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजप (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने मागील निवडणुकीपेक्षा यंदा जास्त जागा जिंकून आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार (nitish kumar) हे मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. कुठे महागठबंधन आघाडीवर होते तर कधी एनडीएने आघाडी घेतली होती. पण, दुपारी 12 वाजेनंतर चित्र हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एनडीएने सर्वाधिक 124 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 122 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे. तर  राजद महागठबंधनला 109 जागावर आघाडीवर आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 2 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. एकटा भाजपने सर्वाधिक 71 जागांवर मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 53 जागा आल्या होत्या. तर नितीशकुमार यांच्या जदयूला 71 जागा मिळाल्या होत्या. पण, आता जदयूची घसरगुंडी झाली असून 47 जागांवर आघाडीवर आहे.  त्यामुळे भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्यामुळे नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे. जदयूचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी सांगितले की, 'कोणत्याही पक्षाच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच होतील.' बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री हे नितीशकुमारच असणार आहे. भाजपने निवडणूक जिंकली आहे. काँग्रेस पक्ष हा संपुष्टात येत आहे. गावागावात, शेतकऱ्यांनी मोदी यांना पसंती दिली आहे. महिला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.  80 कोटी लोगांना रेशन मिळाले आहे, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित होता, असंही सिंह म्हणाले. निवडणूक प्रचारात विरोधकांनी खरे मुद्दे न मांडता खोटा प्रचार केला होता. नितीश कुमार यांनी बिहारला ऊर्जा देण्याचे काम केले आहे. जंगलराज मुक्त बिहार केलं आहे, असं सिंह म्हणाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे तर जदयू 48 जागांवर आघाडीवर आहे. तर व्हीआयपी पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या